हे त्रिशूळ सरकार नसून एक फुल दोन हाफ…; ठाकरेंचा हल्लाबोल

हे त्रिशूळ सरकार नसून एक फुल दोन हाफ…; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट आणि भाजपसोबत गेले. दरम्यान, यावरूनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली. सध्याचं सरकार हे त्रिशुळ सरकार नसून एक फुल दोन हाफ सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. ( Uddhav Thackeray poharadevi meeting they critisize On BJP Shinde group and ajit pawar)

उद्धव ठाकरेंची आज पोहरादेवी इथं जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करतांना त्यांनी भापजसह शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीचं सरकार तीनपायाचं होतं, अशी टीका तेव्हा भाजपने केली होती. आमचं महाविकास आघाडीचं सरकार तीनपायाचं अन् तुमचं सरकार त्रिशुल कसं ? असा सवाल करत हे सरकार एक फुल, दोन हाफ सरकार आहे, अशी जळजळी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांची घरं सांभाळा, दुसऱ्यांचे घरं का फोडता? ठाकरेंचा फडणवीसांना सवाल 

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात संकटकाळात शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. राज्याला आता एक मुख्यमंत्री अन् दोन मुख्यमंत्री आहेत. राज्यात भाजपचं संयुक्तिक सरकार आहे. केंद्रातही भाजपचं सरकार आहे. मग तरीही शेतकऱ्यांचे वीजबिल का माफ होत नाही? आमदार पळवा-पळवीच्या आणि सत्तेच्या नादात सामान्य माणासांना काय मिळालं? शेतकऱ्यांना काय मिळालं? शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत, त्या रोखण्यासाठी काही पाऊल उलणार आहे की नाही? पोहरादेवी क्षेत्राच्या विकासाचं काय झालं? अशी प्रश्नांची सरबत्ती करत नालायकांच्या गैरकारभारामुळं जे शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्या घराकडे सरकारचं लक्ष नाही, हे दुसऱ्यांचे घर फोडण्यातच मग्न आहेत, अशी टीका केली.

सत्ताधारी माजले आहेत. आता समान नागरी कायद्याची चर्चा होते. मुलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हे नवनवे मुद्दे भाजप माडंत आहे. एक वेळ आम्हाला एक देश-एक कायदा मान्य, पण, एक देश एक पक्ष कदापी मान्य होणार नाही, असा घणाघात त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube