अनिल परबांनी योगेश कदमांना संपवण्याचा कट केला
मुंबई : रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते बचावले असून चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आता या प्रकरणी रामदास कदम यांनी धक्कादायक विधान केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
राम कदम नेमकं म्हंटले काय?
उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना असा माझ्या मनामध्ये संशय आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळ शुक्रवारी रात्री गंभीर अपघात झाला. अपघातामध्ये योगेश कदम बचावले असून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तो अद्याप फरार असल्याचे समजते, त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात वाटत आहे, असे रामदास कदम म्हणाले.