बायकोला सरपंच करून थेट तीन वर्षांनंतर दाढी करणार हा पठ्ठ्या !

  • Written By: Published:
बायकोला सरपंच करून थेट तीन वर्षांनंतर दाढी करणार हा पठ्ठ्या !

सोलापूरः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर अनेक जण नवस करतात. काही जण वेगळे निर्धार करतात. आपला नेता विजयी होईपर्यंत चप्पल घालणार, दाढी करणार नाही, असे अनेक जण आहेत. तसाच निर्धार पंढरपूरमधील एकाने केलाय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची पत्नी विजयी झाली आहे. त्यामुळे तो आता तीन वर्षानंतर दाढी, डोक्याचे केस काढणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यात आजोती ग्रामपंचायतीचा समावेश होता. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरजित पवार यांनी राष्ट्रवादीचा सरपंच होऊपर्यंत दाढी, कटिंग करणार नाही, असा निर्धार केला होता.

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्याची पत्नी आरती या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. या मोठ्या फरकाने निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण करून जोरदार जल्लोष केलाय. अमरजित पवार यांनी जल्लोष करत असताना ‘झुकैंगा नही साला स्टाईल’ही करून दाखविली आहे.

यावर अमरजित पवार म्हणाले, गावात राष्ट्रवादीचा सरपंच होऊपर्यंत दाढी, कटिंग करणार नाही, असा निर्धार केला होता. नागरिकांनी माझ्या पत्नीला निवडून दिल्यानंतर हे केस तिरुपती बालाजी येथे अर्पण करणार आहे. तसेच गावकऱ्यांना विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube