सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक तिरंगी; दोन्ही राष्ट्रवादीसह भाजपही मैदानात
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. दिवंगत नेते अजित पवार
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा होत असलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेनेशी युती झाली असल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली आहे. तसेच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून 21 उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून बंड केलेल्या पुरुषोत्तम जगताप (Purushottam Jagtap) यांनी देखील स्वतंत्र पॅनेल उभा केला आहे. पुरुषोत्तम जगताप भाजपसोबत (BJP) असल्याने ही निवडणूक तिरंगी झाली आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्यासह भाजपने पुरंदर मधील शरद पवार गटाचे दोने नेते देखील सोबत घेतले आहे. आज या निवडणुकीसाठी (Someshwar Sugar Factory Election) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी तीन पॅनल आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत.
सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा जोराने राज्यातील राजकारणात सुरु होती. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील प्रयत्न केले असल्याची चर्चा आहे मात्र आता ही निवडणूक तिरंगी होत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 महत्त्वाचे आर्थिक नियम; जाणून घ्या सर्वकाही
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का दिल्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांच्यासह कोणीही अजित पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय करु नये असं एका परिपत्रकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.