राज्य सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने : प्राजक्त तनपुरे

राज्य सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने : प्राजक्त तनपुरे

अहमदनगर : राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची आक्षेपार्ह बदली रद्द न झाल्यास तालुकाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

राहुरीत विरोधी पक्षांतर्फे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ नगर-मनमाड महामार्गावर आज विविध सामाजिक संघटना आयोजित रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, हे राज्य सरकार विरोधकांचा आवाज दडपत आहे. त्यामुळे रस्त्यावर येऊन आम्ही जनतेसमोर आमचा आवाज उठवू. तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची चौकशी करण्याच्या आम्ही विरोधात नाही.

काही चुकीचे असेल तर आम्ही त्यास पाठीशी घालणार नाही. धर्मांतर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही मात्र त्या अडून कोणाची दहशत ही खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

लक्षवेधी ही तातडीच्या घटनांवर असते आठ महिन्यांपूर्वी झालेल्या घटनांवर लक्षवेधी स्वीकारण्याचा निर्णय आक्षेपार्ह आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, बाळासाहेब जाधव, संतोष चोळके, सचिन साळवे, अनिल जाधव, डॉ. जयंत कुलकर्णी, रावसाहेब तनपुरे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube