दुष्काळी पाहणीसाठी सुनेत्रा पवार, आदित्य ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

Sunetra Pawar and Aditya Thackeray Visit Drought-Hit Areas; महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागांची सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरे आज पाहणी करणार.

Sunetra Pawar and Aditya Thackeray Visit Drought-Hit Areas; महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागांची सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरे आज पाहणी करणार.

Sunetra Pawar and Aditya Thackeray Visit Drought-Hit Areas in Maharashtra: राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतातील पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, आता सरकारमधील मंत्री आणि विरोधकांकडूनही दुष्काळी भागांची पाहणी सुरू झाली आहे.

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या रविवार असूनही बँका सुरू; सोमवारपासून 3 दिवसांचा संप, आजच उरकून घ्या बँकेची कामं

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नांदेड, परभणी आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सुनेत्रा पवार आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील दुष्काळसदृश भागाची पाहणी करणार आहेत. सकाळी 8 वाजता त्या नांदेड विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता शेतातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

राज्यभरात गणपती विसर्जनाचा भक्तांमध्ये जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात असतानाच विरोधकांकडूनही पाहणी दौरे सुरू आहेत. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज सोलापूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासोबतच ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे सकाळी 10.30 वाजता सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता तुळजापूर तालुक्यातील खानापूर आणि दुपारी 12 वाजता लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथे पाहणी करणार आहेत. दुपारी 4 वाजता नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गऊळ येथेही ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

SIR वरून वाद पेटला, भाजप नेत्याचा ज्ञानेश कुमारांना खुला पाठिंबा; थेट पद्मभूषण देण्याची मागणी

राज्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांना फटका बसला आहे. काही भागात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. धरणांमधील पाणीसाठाही कमी होत असून, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधकांच्या आजच्या दौऱ्यांकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

follow us