राजकारण बाजूला सारुन नणंद भावजयींनी नातं जपलं! सुप्रियाताई अन् सुनेत्रावहिनींचं फोटो सेशन

राजकारण बाजूला सारुन नणंद भावजयींनी नातं जपलं! सुप्रियाताई अन् सुनेत्रावहिनींचं फोटो सेशन

राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच पवार कुटुंबिय एकाचं मंचावर दिसून आले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे एकाच कार्यक्रमात दिसून आले आहेत. दौंडमधील आयोजित अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान, नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार यांनी फोटोशूट केलं आहे. राजकारण बाजूला सारुन नणंद भावजयांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे, राष्ट्रवादीत उभ्या फुटीनंतर पवार घराण्यातील सर्वच सदस्य एकत्रितपणे दिसून आले आहेत. या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

BJP : ‘तुमच्या याच प्रवृत्तीमुळे संपूर्ण पक्ष फुटला’; बावनकुळेंवरील पवारांची टीका भाजपला झोंबली

सुप्रिया सुळे सध्या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार आहेत. याच लोकसभा मतदारसंघातून आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. त्यावरुन लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीतला संघर्ष वाढल्यास सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येईल, असंही भाकीत अनेकांकडून केलं जात आहे. अशातच आजच्या कार्यक्रमात नणंद आणि भावजय एकत्रित दिसल्याने राजकारण बाजूला सारुन सुळे आणि पवार नातं जपत असल्याचंच दिसून येत आहे.

‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी

राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एका मंचावर आले असून या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि शरद पवार काय बोलणार याकडं सर्वाचंच लक्ष लागून होतं मात्र शरद पवार आणि अजित पवार यांनी कार्यक्रमात कोणतंही राजकीय भाष्य केलं नसल्याचं दिसून आलं आहे. मात्र, शरद पवार यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा आणि अजित पवार यांनी शरद पवारांच्या कार्याचा उल्लेख करीत संस्थेची प्रगतीबद्दल भाष्य केलं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या समोरच त्यांनी कर्मचाऱ्यांना दम देऊन चांगलं काम करण्याच्या सूचना दिल्याचं पाहायला मिळालं.

आता एक घंटा देखील वाढवून मिळणार नाही आणि आरक्षण घेऊनच राहणार; जरांगे पाटील आक्रमक

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप-शिंदे गट-अजित पवार गट तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. त्यामुळे सर्वच गटाच्या पक्षाच्या नेत्यांकडून मतदारसंघात चाचपणी करण्यास सुरुवात झालीयं. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघावरही अनेक नेत्यांचा डोळा असल्याचं पाहायला मिळतंयं. या मतदारसंघात अजित पवार यांचं वरदहस्त अधिक असल्याचं बोललं जातं त्यामुळे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी मिळाल्यास निवडणुकीत नणंद आणि भावजयीमध्ये लढत होईल, अशीही चर्चा सुरु आहे.

आगामी निवडणुकीत अजित पवार गट मूळ राष्ट्रवादी पक्षासोबत येईल की महायुतीसोबत निवडणुकीला सामोरं जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे महायुतीत अजितदादा गट सामिल असेल तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गट दावा ठोकणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube