सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी हे भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात ?

Vidhan Parishad Election -सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि लखानी यांचा मुलगा सारंग विवाह सोहळा लवकरच होणार आहे.

  • Written By: Published:
Arun Lakhani Bjp

Vidhan Parishad Election : स्थानिक स्वराज्य संस्थामधून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) जोरदार रस्सीखेच सुरू आहे. चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधानपरिषदेची जागा भाजप (BJP) लढणार आहे. उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झालीय. लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि लखानी यांचा मुलगा सारंग विवाह सोहळा लवकरच होणार आहे. त्यात आता लखनी यांचे नाव विधानपरिषदेसाठी चर्चेत आले आहे.


पुण्यात अग्रेको इंडियाची 400 कोटींची गुंतवणूक; प्रकल्पातून पुढील 10 वर्षांत 1 हजार रोजगार निर्माण होणार

ही चर्चा सुरू असताना रविवारी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लग्नाची निमंत्रणपत्रिका दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी हे उपस्थित होते. त्यानंतर भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत अरुण लखानी यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अरुण लखनी यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे.


जिथं अखंड भारताचा पाया रचला! केंद्र सरकारच्या रडारवर आलेल्या दिल्ली जिमखाना क्लबचा इतिहास

अरुण लखानी हे असू देत किंवा कुठला दुसरा उद्योगपती असू देत. शेवटी ते उद्योगपतीच आहेत. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेर जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पाच-पाच लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचे काम सुरू आहे. ही सवय 2014 पासून सर्वांना लागली आहे. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक राजकारणात पैसे गुंतवत आहेत. राजकारण आणि समाजकारण प्रामाणिक राहिले नाही. आता उद्योजकपती, ठेकेदार, कंत्राटदार विधानपरिषद, विधानसभेत दिसतील. सामान्य माणूस कुठे दिसणार नाही, अशी परिस्थिती भविष्यात दिसणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

नगरसेवकांना पंधरा लाख

विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार या मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, अद्याप काही ठरलेले नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. दुसरीकडे प्रचंड धनशक्ती आहे. मोठ-मोठ उमेदवार आहेत. पंधरा लाख रुपयांचे रेट उघडला आहे. पंधरा लाख एका नगरसेवकांना दिल्यानंतर त्यांना वाटतंय दिवाळी झाली आहे. पंधरा लाख रुपये देऊन निवडणुका होत असतील, लोकशाही शिल्लक राहणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

विधानपरिषदेची निवडणूक शंभर कोटींची-वडेट्टीवार

आता सामान्य माणसांच्या या निवडणुका आवाक्याबाहेर आहेत. एवेढेच मी सांगेल, अधिकृत डिक्लेअर होऊ द्या. मग आम्ही निर्णय जाहीर करू. काही नगरसेवक सहलीवर गेले आहेत. आमचा उमेदवार ठरलेला नाही. कोकणात जाण्यासाठी फिरविण्यासाठी पाच लाख रुपये दिले आहे. ही शंभर कोटींची निवडणूक असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय.

follow us