मोहटादेवीची शपथ घेऊन सांगा शरद पवार हुकुमशाह, सुप्रिया सुळेंचे थेट आव्हान

मोहटादेवीची शपथ घेऊन सांगा शरद पवार हुकुमशाह, सुप्रिया सुळेंचे थेट आव्हान

Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी (NCP symbol) दोन्ही गटाकडून दावा केला जातो आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगात युक्तीवाद सुरु आहे. 6 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या युक्तीवादात अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर आहे, असा दावा केला होता. यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट अजित पवार गटाला आव्हान दिले आहे. मोहटादेवीची शपथ घेऊन सांगा की शरद पवार हुकुमशाह आहे, असे चॅलेज दिले आहे.

खासदार सुप्रिया सुळे पाथर्डी येथे जाहीर सभेत म्हणाल्या की निवडणूक आयोगात अजित पवार गटाने युक्तीवाद केला की शरद पवार हुकमशाह आहेत. माझी त्यांना विनंती आहे. मोहटादेवीला या, शपथ घेऊन सांगा की शरद पवार हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते, असे थेट आव्हान दिले आहे.

सभागृहाबाहेरील आरोपांवर राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘माझ्या निर्णयावर..,’

त्या पुढे म्हणाल्या की महेबुब शेखने मला सांगितले की बाकी सगळे खोटे बोलतील पण मोहटादेवीची खोटी शपथ घेणार नाहीत. आज शरद पवार यांच्यावर सगळे वार करत आहेत. त्यांना विनंती करते की आपण सगळे मोहटादेवीला येऊ. तुम्ही तुमचं मांडा आणि मी माझं मांडते पण शपथ मोहटादेवीची घ्यायची.

रोहित पवारांच्या संघर्षाचं बिगुल वाजलं; दसऱ्याला शरद पवारांच्या सभेने यात्रेची सुरुवात

दरम्यान, राष्ट्रवादीच्या चिन्हाचा पहिला युक्तीवाद 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात झाला. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या सुनावणीला हजर राहिले होते. त्यानंतर दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. यावेळी अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता पुढील सुनावणी आज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube