भाजपने फडणवीसांवर अन्याय केला, 105 आमदार असुनही…; सुप्रिया सुळेंचा टोला

भाजपने फडणवीसांवर अन्याय केला, 105 आमदार असुनही…; सुप्रिया सुळेंचा टोला

Supriya Sule : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचं सरकार आलं. त्यानंतर अडीच वर्षींनी मी पुन्हा येईलची घोषणा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हा मुख्यमंत्रीपद फडणवीसांना मिळेल, असं वाटत होतं. पण, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. आता अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला. दरम्यान, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हणाले. यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर (BJP) टीका केली.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 162 जागांची भरती, थेट मुलाखातद्वारे होणार निवड 

सोलापूर लोकसभा मतदार संघाचा सुप्रिया सुळेंनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप अन्याय करत आहे. याच्या मला वेदना होत आहेत. कारण, हा फक्त देवेंद्र फडणवीसांचा नाहीतर भापजचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा अपमान आहे, गेल्या 60 वर्षांत काँग्रेसच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, सतरंजा उचलणारे आणि लाठ्या खाणाऱ्यांच्या कष्टामुळं भाजपचे 105 आमदार निवडून आले. तरीही त्यांच्या पदरात काही पडलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांनी कॉंग्रेस विचारांचा मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला आहे, याचं मी मनापासून स्वागत करते. कारण, भाजप सतत कॉंग्रेसमुक्त भारत व्हावा, असं म्हणायचा. कॉंग्रेसमुक्त भारत विचार सोडा, पण भाजपचे जास्त आमदार निवडून आले, तरी कॉंग्रेसच्या विचारांचा मुख्यमंत्री त्यांना पाहिजे, असा सुळेंनी म्हणाल्या.

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे चिन्ह आपल्याच मिळेल, असा दावा केला जातोय. यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. जर बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीचा पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय झाला तर तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लहान मुलांनाही राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे माहीत आहे. माझा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. पण, एक चिंतेची बाब म्हणजे, परीक्षेला बसण्यापूर्वीच समोरील गटला निकाल कसा माहिती? चिन्ह याच तारखेला मिळणार, हेही कसं माहिती? एकतर पेपर फुटला आहे किंवा दिल्लीतील कोणत्यातरी अदृश्य शक्तीने तुम्हाला निवडणूक चिन्ह आणि पक्ष मिळेल, असे सांगितले आहे, अशी शंका सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube