सरकार मेट्रोला हजारो कोटी रुपये देता, एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? सुप्रिया सुळेंचा सवाल

सरकार मेट्रोला हजारो कोटी रुपये देता, एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule : बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनला हजारो कोटी रुपये सरकार देतं. मग एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? मात्र, एसटी कामगारांना पगारासाठी आंदोलन करावी लागतात, त्यांना पगार मिळत नाहीत आणि सरकार मेट्रो प्रकल्प उभारते. जेव्हा रोटी, दाळ-भाकरी, पीठलं खायला मिळतं तेव्हा मोदक खातो आपण. यांचा मोदक आधी चाललाय. उपाशी बाकीची जनता आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी सत्ताधारी भाजप (BJP) सरकारच समाचार घेतला.

पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी विकासकामे आणि योजनांवरून सडकून टीका केली. सुळे म्हणाल्या, सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. मात्र, गावखेड्यात बसचं वेळेवर येत नाही. बस वेळेवर पोहोचली तरच महिलांना मोफत प्रवास करता येईल… सरकार बुलेट ट्रेनवर खर्च करते. मेट्रोला हजारो कोटी रुपये सरकार देतं. मग एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

त्या म्हणाल्या, एसटी कामगारांना पगारासाठी आंदोलन करावी लागतात, तरीही त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यांना पगार मिळत नाहीत आणि सरकार मेट्रो प्रकल्प उभारते. जेव्हा रोटी, दाळ-भाकरी, पीठलं खायला मिळतं तेव्हा मोदक खातो आपण. यांचा मोदक आधी चाललाय. उपाशी बाकीची जनता आहे, असं सुळे म्हणाल्या.

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप करतेय; सुप्रिया सुळेंचा कांदाप्रश्नी हल्लाबोल 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, युपीएच्या काळात दौंड तालुक्यात पावणे दोनशे ट्रेन थांबायच्या. आज दौंडला ३८ ट्रेन थांबबात. म्हणजे दिडशे ट्रेन बंद झाल्या. आणि वर भाजपच विचारतेय, कॉंग्रेसने काय केलं? मी सगळ्यांना मुलांना स्टेशनला घेऊन जाणार आहे आणि सांगणार आहे की, याला ट्रेन स्टेशन म्हणतात. हा प्लॅटफॉर्म कॉंग्रेसने बांधला. इथं शौचालय कॉंग्रेसने बांधलं. वीज कॉंग्रेसने आणली. तुम्ही ज्या शाळेत शिकलात, ती शाळा कॉंग्रेसने बांधली. पण, ही बुलेट ट्रेन भाजपने बाांधली. कॉंग्रेसचं सरकार होतं तेव्हा ही ट्रेन गरिबांसाठी थांबायची. आता ही ट्रेन तुमच्यासाठी नाही, पैशेवाल्यांसाठी आहे, असं सुळे म्हणाल्या.

पुरंदरच्या एअरपोर्टविषयी बोलतांना सुळे म्हणाल्या, इथं एअरपोर्ट झालाचं पाहिजे, मात्र, त्याची जागा पुरंदरकरवासीच ठरवलीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube