केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप करतेय; सुप्रिया सुळेंचा कांदाप्रश्नी हल्लाबोल
Supriya sule : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के कर लावला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला घेरले. आता राष्ट्रवादीच्या खासदार (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्र सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावरून जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सातत्याने करते आहे. केंद्र सरकार बोलत एक आणि करतं एक. निवडणुकी आधी त्यांनी आश्वासन दिलं होतं की, प्रत्येक शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. मात्र, मात्र, गेल्या ९ वर्षात कोणत्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पटं झालं? हे सरकारने एकदा सांगावं, असं सुळे म्हणाल्या.
भावी खासदार बाळासाहेब थोरातसाहेब तुम आगे बढो…; कार्यकर्त्यांच्या घोषणांनी चर्चांना उधाण
सुळे म्हणाल्या, चार महिन्यांपासून केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना सांगते की, कांद्यासाठी काहीतरी ठोस भूमिका घ्या. मात्र, सरकारने काही केलं नाही. जेव्हा जगात कांद्याची गरज होती आणि भारतात कांदा उत्पादन जास्त झालं, तेव्हा कांदा निर्यात केली असती तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले असते. टोमॅटोमध्ये दोन पैसे मिळायला लागले तेव्हा नेपाळमधून टोमटो आयात केला. जेव्हा पैसे शेतकऱ्यांना पैसै मिळालया लागतात तेव्हा सरकार निर्यात होऊ देत नाहीत. पैस मिळायला लागतात तेव्हा आयात करतात, हे सरकारचं धोरण आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.