Supriya Sule : पती गमाविलेल्या महिलांबाबतच्या निर्णयावरून सुप्रिया सुळे राज्य सरकारवर संतापल्या

Supriya Sule : पती गमाविलेल्या महिलांबाबतच्या निर्णयावरून सुप्रिया सुळे राज्य सरकारवर संतापल्या

Widow Women Get A New Identity : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिलं. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत. यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक बनले आहेत. जेव्हा त्यांना अपंग म्हणून संबोधले जायचे तेव्हा त्यांना कमी पणा वाटायचं आणि समाजाचा देखील त्यांच्या कसे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असायचा.

केंद्र सरकारने जसे अपंगांना दिव्यांग नाव दिले याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधवांना नवीन ओळख मिळून देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधवा ऐवजी गंगा भगीरथी हा शब्द वापरण्याबाबत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून परिपूर्ण प्रस्ताव तयार करून चर्चा करण्यास सांगितली आहे. आता राज्यातील विधवा महिलांना नवी ओळख मिळणार आहे. त्यादेखील आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील तसेच समाजामध्ये मानाचे स्थान मिळेल. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल. आणि त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील.

मात्र आता या निर्णयावर विरोधीपक्ष आणि सामाजिक स्तरावरून टीका करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील विधवा महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत सरकार विचार करीत आहे मात्र हे अतिशय वेदनादायी आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी व क्रांतीज्योती सावित्रीमाई अशा कर्तुत्ववान महिलांनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे. फुले-शाहू-आंबेडकर-साने-कर्वे यांच्या प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली आहे.

Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’

महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून मंत्री मंगलप्रभात लोढा आपण निर्णय घेतला पाहिजे अशी सूचनाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube