पक्षप्रवेश रखडला तरीही नाथाभाऊ सुनेसाठी मैदानात, गिरीश महाजन म्हणाले, ‘ते राष्ट्रवादीचे…’
Girish Mahajan on Eknath Khadse : कधी काळी भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) ज्येष्ठ नेते राहिलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी स्वत: आपण लवकरच स्वगृही परतणार असल्याचं जाहीर केले आहे. मात्र, अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. तरीही ते रावेरच्या उमदेवार असलेल्या रक्षा खडसेंच्या (Raksha Khadse) प्रचारात सहभागी झाले. त्यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यावर खडसेंवर टीकास्त्र डागलं.
प्रकाश आंबेडकरांना धक्का! वंचितने पाठिंबा काढल्यावर आनंदराज आंबेडकरांनी वाढवली शेंडगेंची ताकद
एकनाथ खडसेंनी दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून रक्षा खडसेंच्या प्रचाराची धुरा हाती घेतली. त्यामुळं स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. खडसे हे पक्ष प्रवेशाशिवाय भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. इतकचं नाही तर ते यावलमधील भाजपच्या प्रचार कार्यालयात ठाण मांडून बसले असून भाजप कार्यकर्त्यांना प्रचाराच्या सूचनाही देत आहेत. पक्षात नसतांनाही खडसे बैठक घेत असल्यानं भाजपचे कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहे.
ॲनिमलनंतर आता बॉबी दिसणार औरंगजेबाच्या भूमिकेत; ‘या’ साऊथ सुपरस्टारशी होणार स्पर्धा
फक्त औपचारिकता बाकी…
रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याबद्दल एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपमध्ये येण्याबाबत मी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. आणि माझ्या पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे. माझ भाजप प्रवेश निश्चित असून त्याची तारीख लवकरच ठरेल, असं भाजपचे नेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल असून तोपर्यंत काम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत.
गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महाजन म्हणाले, खडसे कधी म्हणतात, मी राष्ट्रवादीचा आहे, तर कधी सांगतात भाजपचा आहे. मात्र, सध्या ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे एकनाथ खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं, असा खोचल सल्ला महाजन यांनी दिला. ते म्हणाले, खडसेंच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. मुलगी तुतारी घेऊन उभी राहण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच खडसेंना सर्व पक्ष घरात ठेवायचे आहेत. त्यांची भूमिका संधिसाधू असल्याची टीका महाजन यांनी केली आहे.