प्रकाश आंबेडकरांना धक्का! वंचितने पाठिंबा काढल्यावर आनंदराज आंबेडकरांनी वाढवली शेंडगेंची ताकद
Anandraj Ambedkar Support Prakash Shendage : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सुरूवातीला सांगलीतून ओबीसी बहुजन पक्षाचे (OBC Bahujan Party) अध्यक्ष प्रकाश शेंडगेंना (Prakash Shendage) वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शेंडगेंचा पाठिबा काढून घेतला होता. दरम्यान, आता प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
ॲनिमलनंतर आता बॉबी दिसणार औरंगजेबाच्या भूमिकेत; ‘या’ साऊथ सुपरस्टारशी होणार स्पर्धा
काँग्रेसविरोधात बंडखोरी करून लोकसभेच्यचा रिंगणात उतरलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सांगलीत आता बहुरंगी लढत होत असली तरी खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी होत आहे. पाटील यांच्या अपक्ष उमेदावारीमुळं मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटील यांची ताकद वाढवली आहे. वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला. विशाल पाटील अपक्ष राहिल्यास पाठिंबा जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते, त्यानुसार त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
मोठी बातमी! कल्याणमध्ये ठाकरे बदलणार उमेदवार? माजी महापौरांचा अर्ज दाखल
आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडी अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत आहे, तर आता आनंदराज आंबेडकरांनी ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देत आहेत.
वंचितने पाठिंबा काढून घेतल्यानंतर प्रकाश शेंडगेंनी नाराजी व्यक्त केली होती. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना वंचितने पाठिबा दिलाय त्यात आश्चर्च वाटत नाही. वंचित बहुजन आघाडीने वंचितची व्याख्या बदलली असेल, कदाचित विशाल पाटील हे वंचित असतील, त्यामुळं त्यांनी पाठिंबा दिला असेल. वंचितांच्या कल्याणासाठी स्थापन झालेला पक्ष प्रस्थापित पक्षातील लोकांना पाठीशी घालत आहे, हे समजण्यापलीकडचे आहे, असं शेंडगे म्हणाले होते.