ज्येष्ठ नेत्याचा अपमान पंतप्रधानांना शोभत नाही; पवारांवरील टीकेवरून राहुल गांधींकडून मोदींचा समाचार
Rahul Gandhi Criticize PM Modi for Insult of Sharad Pawar : आज ( 3 मे ) पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे आणि कॉंग्रेलचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सभा घेतली यावेळी त्यांनी शरद पवारांचा ( Sharad Pawar ) अपमान केला म्हणून मोदींवर ( PM Modi ) टीकास्त्र सोडलं.
सारखे नाव असणाऱ्यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
पुण्यातील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये केलेल्या घोषणांबद्दल लोकांना पुन्हा एकदा आश्वासन दिलं. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या भटकती आत्मा या टीकेवरून निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एक पंतप्रधान म्हणून महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारीवर बोलणं आपेक्षित होतं. मात्र त्यांनी येथे येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अपमान केला. हे एका पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभणारं वक्तव्य नव्हतं. असं म्हणत राहुल यांनी मोदींचा समाचार घेतला.
राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिली ? उत्तर द्या, अमित शहांचा शरद पवारांना सवाल
तसेच या सभेमध्ये राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी शहांवर सडकून टीका केली. ते म्हणाले नरेंद्र मोदी यांनी भाजपला संविधान मिटवायचा आहे. तसेच देशभरात शेतकरी उपाशी मरत आहेत. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे. मोदी आणि भाजप मात्र शेतकरी आणि गरिबांचं नाही. तर देशातील 22 श्रीमंत लोक सांगतील तेच करतात. त्याच लोकांचं कर्जही माफ केलं जातं. असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान पुणे लोकसभेमध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धंगेकर म्हणाले की, महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कामाच आजही कोतुक होतं. परंतु, फडणवीस असे नेते आहेत की, ते ज्यादिवशी राजकारण सोडतील त्यानंतर त्यांना नमस्कार करायलाही कुणी शिल्लक राहणार नाही. असा थेट घणाघात धंगेकरांनी केला आहे. तसंच, सत्ता असल्यामुळेच आज लोक त्यांना नमस्कार करतात असही ते म्हणाले.