भाजप प्रवेशानंतर तनपुरेंची जयंत पाटलांवर प्रतिक्रिया म्हणाले, ते मामा अन् मी भाचा असलो तरी…
Prajakt Tanpure यांनी भाजप प्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी मामा जयंत पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली.
Tanpure’s reaction to Jayant Patil after joining BJP : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात शनिवार 30 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यानंतर तनपुरेंनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी मामा जयंत पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे?
माझ्या प्रवेशाचा आणि मामा जयंत पाटील यांच्या जकीय समीकरणाचा काही संबंध नाही. आम्ही नातेवाईक असलो ते मामा असले मी भाचा असलो आमच्या दोघांच्या मतदारसंघाचे राजकीय समीकरण वेगवेगळे आहेत. त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे. माझ्या प्रवेशाचा त्यांच्या राजकारणाशी कुठला संबंध नाही.
IPL 2026 Final: हॉटेलची रुम तीस हजारांना, विमान तिकीट 38 हजारांवर; अहमदाबादमध्ये दर गगनाला !
मी एका बैठकीला होतो. तेथे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीणीकरणासंदर्भात चर्चा होत्या. दादा स्वतः त्या बैठकीला होते. त्यावेळी
दादा एकटेच होते. मी ताईंना काल भेटलेलो आहे. माझ्या काय भावना आहेत ताईंच्या कानावर घातल्या आहेत. त्यांच्या सदिच्छा माझ्यासोबत राहतीलच. मी शरद पवार यांना अवश्य भेटेन ते काय बोलले मला माहित नाही. शरद पवार यांची एक दोनदा फोनवर चर्चा झाली.
मामा आणि शरद पवारांना भेटायची हिंमत नाही…
मी आज मोठा निर्णय घेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी राष्ट्रवादीसोबत जोडलेलो आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा नसून सध्याच्या परिस्थितीनुसार मी ज्यांच्या जीवावर राजकारण केलं. त्या कार्यकर्त्यांसाठी मी हा निर्णय घेतला आहे. कारण माझ्या कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे की, भाजप प्रवेशानेच त्यांच्या भागाला निधी मिळेल. त्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यांचं राजकारण देखील पाहायचं आहे.
स्वामींनंतर आता समर्थ रामदासांवरील ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित!
तसेच जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा मी पक्षासोबत राहिलो. मी तेव्हा विचारांवर ठाम रोहिलो. मात्र मी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय. माझे मामा जयंत पाटील आणि शरद पवार यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही. मला आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलणं देखील अवघड झालं आहे.