Shivsena Supreme Court Hearing : आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार…कामत यांच्या युक्तिवादावर SC काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सुनावणीदरम्यान केला आहे.

shivsena

Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (Shivsena) चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आपली बाजू सविस्तरपणे मांडलीयं. सर्वोच्च न्यायालयाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद कामत यांनी यावेळी केला आहे. कामत यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही महत्वपूर्ण टिप्पणी करण्यात आलीयं.

सुनावणीदरम्यान, वकील देवदत्त कामत म्हणाले, पक्षात फूट पडलेली आहे की, नाही याचा सोक्षमोक्ष लावला गेला पाहिजे. आमदारांच्या अपत्रातेच्या निर्णयाआधीचं आयोगाने पक्ष, चिन्ह शिंदेंना दिलं आहे. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे, हे चिन्ह कोणाला नसेल द्यायचे तर ते गोठवा. एखाद्या पक्षात 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांना देऊन टाकणार का? असा थेट सवालही कामत यांनी केला आहे.

तसेच राजकीय पक्ष फुटला की तरच चिन्हाचा मुद्दा येतो. फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत. निवडणूक आयोग न्यायाधिकरणासारखे आहे, सर्वोच्च न्याय देणारे नाही. कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा. पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं. राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का? पक्षातून वेगळं व्हायचं असले तर वेगळा पक्ष काढा. पक्षांतर कायद्यात अध्यक्ष अपयशी ठरले तर कोर्ट निर्णय घेऊ शकते. विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वत: अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो, असंही कामत यांनी स्पष्ट केलंय. देवदत्त कामत यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयानेही टिप्पणी केली असून आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. यामध्ये काहीच शंका नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केलेली आहे.

युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुरानाची “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” कार्यक्रमाला भेट

दरम्यान, काल झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही गटाला या चिन्हाचा वापर करू देऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. या मागणीमुळे सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादानंतर पुढील सुनावणीदरम्यान नेमकं काय घडणार? याकडे सर्वाचंच लक्ष लागून राहिलंय.

follow us