‘सरडासुद्धा आत्महत्या करेल हो’; ‘मंत्रिपदावरुन का काढलं नाही’ म्हणणाऱ्या फडणवीसांना अंधारेंचं प्रत्युत्तर

‘सरडासुद्धा आत्महत्या करेल हो’; ‘मंत्रिपदावरुन का काढलं नाही’ म्हणणाऱ्या फडणवीसांना अंधारेंचं प्रत्युत्तर

Sushma Andhare On Devendra Fadnvis : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) नवाब मलिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं. या घडामोडीवरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. अंधारेंनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत फडणवीसांना उत्तर दिलं आहे. एका तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपनं केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतलं आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचं मंत्रिपद का काढून घेतलं नव्हतं असा प्रश्न विचारतात? फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

‘सत्यजित आवाज देत नाहीस, तुम्हीच आवाज बंद केला’; चव्हाणांच्या सवालावर तांबेंचं खास शैलीत प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक अजित पवार गटासोबत सत्ताधारी बसले होते. त्यांच्या आसनावरुन अजित पवार गटाच्या गोटात सामिल झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अंबादास दानवे म्हणाले, सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांच्यावर त्यांनीच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.

दानवेंच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष तुरुंगात असताना देखील आम्ही मंत्रिपदावरुन काढणार नाही ते आता इथं भूमिका मांडत असल्याचं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं होतं.

ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली होती. मात्र या प्रकरणात न्यायालयाने त्यांना तब्बल दीड वर्षानंतर जामीन मंजूर केला. त्यानंतर मलिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube