मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मालमत्ता, संपत्तीचा मोह नाही

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मालमत्ता, संपत्तीचा मोह नाही

पुणे : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवनावर (Shivsena Bhawan)शिंदे गटाकडून दावा केला जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचं सोमवारी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्ता आणि संपत्तीवर दावा केला जाणार नाही. मालमत्ता आणि संपत्तीचा मोह नाही, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election)पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध समाज घटाकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं (Election Commission)घेतलाय. हा निर्णय मेरीटवर झाला. त्यामुळं त्यावर आक्षेप घेणं चुकीचं असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Sonu Nigam : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्का-बुक्की ? व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, न्यायव्यवस्थेचे काही अधिकार असतात. लोकशाहीत ही संस्था स्वायत्त आहे. आयोगाच्या निर्णयाचं जनतेनं स्वागत केलंय. मात्र निर्णय बाजूनं लागला की चांगला आणि विपरीत लागला की अयोग्य असं म्हणणं चुकीचं असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. नाव आणि चिन्ह मिळाल्यानं विधिमंडळाचं कार्यालय ताब्यात घेतलं. मात्र कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करायचा नाही. त्याचा मोह नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजप-शिवसेनेनं युती म्हणून निवडणूक लढविली. मात्र सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचारांना तिलांजली देण्यात आली. कोणी काही आरोप करत असले तरी त्यावर बोलायचे नाही. खुर्चीसाठी विचारांना तिलांजली दिल्यानंच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली.

दरम्यान, ब्राह्मण समाज नाराज नाही. विरोधकांकडून मुद्दामहून ही अफवा पसरवली जात आहे. कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही, हे मतदार ठरविवात. त्यामुळं अजित पवार काही विधाने करत असली तरी त्यात तथ्य नाही. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळं जनता भाजप-शिवसेना युतीबरोबर आहे. कसब्यात युतीचा उमेदवार विजयी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube