Ajit Pawar : सत्ता बदलली आणि अनेकांची चौकशी थांबली

Untitled Design   2023 02 02T150031.977

मुंबई : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pwar) यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘त्यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील चौकशा करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत. त्यांना अशा प्रकारचे छापे टाकण्याचा अधिकार आहे. पण हे छापे टाकण्याचे नेमके कारण काय ? सारखं सारखं तिथेच का छापे टाकले जातात ? याबद्दल जास्त अधिकाराने स्वतः हसन मुश्रीफच (Hasan Mushrif) सांगू शकतील. त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. अशी माझी माहिती आहे.’

‘आपण पण पाहाताय पाठीमागच्या काळात काही काहींना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. नेटीस देण्यात आल्या होत्या. मात्र काही राजकीय समीकरण बदलली आणि त्यांनी चौकशीसाठी बोलावणे थांबलेलं दिसतं. वास्तविक देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात असं कधी घडत नव्हतं. परंतु आता काही बाबतीत ते घडत आहे. परवा संसदेत देखील विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी देखील हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. ‘

दरम्यान माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी मारण्यास सुरवात केली आहे. मागील काही महिन्यात ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी देखील बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी करण्यात आली. या ३ ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या मुलीच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावर देखील ही छापेमारी टाकण्यात आली होती.

तर दुसरीकडे याआधी ११ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात मुश्रीफ यांच्याशी संबंधित ४ ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली होती. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील आहेत.

follow us