PM Narendra Modi : ‘जो टॅक्स आज झिरो आहे त्यावर यूपीए सरकार 20% टॅक्स आकारत होतं’

PM Narendra Modi : ‘जो टॅक्स आज झिरो आहे त्यावर यूपीए सरकार 20% टॅक्स आकारत होतं’

मुंबई : ‘यावर्षीच्या बजेटमध्ये मध्यम वर्गाला मजबुती देण्यात आली आहे. नोकरदार आणि व्यापारी मध्यमवर्गाला या बजेटने खुश केलं आहे. 2014 पर्यंत ही स्थिती वेगळी होती. जो व्यक्ती वर्षाला दोन लाख रुपये कमावत होता त्यावर कर होता. पण भाजप सरकारने सुरुवातीला पाच लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली. तर आता सात लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली आहे. आज जो टॅक्स झिरो आहे त्यावर यूपीए सरकार 20% टॅक्स आकारत होतं. पण आताच्या निर्णयामुळे नवीन नोकरी करणारे तरुण बचत करू शकणार आहेत. तर गरिब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी काम करणारं सरकार अशा प्रकारचे निर्णय घेतं.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. ते आज वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) गाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये बोलत होते.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, ‘ मला अत्यंत आनंद होत आहे की, आज मुंबईतील लोकांचे जीवन सुखकर होणार आहे. काही प्रोजेक्ट देखील येथे सुरू झाले आहेत. आज ज्या एलिव्हेटेड कॅरीडोरचं लोकार्पण झालं. त्यामुळे मुंबईत पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. मुंबईतील लोक खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते. या कॉरिडोर मुळे तर रोज दोन लाखांहून अधिक गाड्या ये-जा करू शकतील आणि वेळ देखील वाचणार आहे.

हेही वाचा : Vande Bharat Train : पंतप्रधान मोदींनी सांगितली वंदे भारत एक्सप्रेसची खासियत…

एकविसाव्या शतकात भारताला ट्रान्सपोर्ट सिस्टीम खूप गतीने सुधारावी लागणार आहे. जितक्या लवकर ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुधारेल तितक्याच वेगाने नागरिकांचे जीवनात सुधारणार आहे. आज देशात आधुनिक रेल्वे मेट्रो यांचा विस्तार होत आहे. नवनवीन एअरपोर्ट निर्माण केले जात आहेत. यावर्षीच्या बजेटमध्ये देखील त्यासाठी तजवीज करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा कौतुक देखील केलं आहे. कारण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दहा लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी ठेवले आहेत. महाराष्ट्रासाठी देखील यामध्ये मोठा भाग देण्यात आला आहे. मला विश्वास आहे की, डबल इंजिन सरकारच्या डबल प्रयत्नांनी महाराष्ट्रामध्ये आणखी गतीने कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होतं त्यावेळी अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यानंतर अनेक बिजनेसला मार्ग मिळतो. असं देखील ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube