‘सावकाश’ हा शब्द माझ्या कोशात नाही, असं म्हणत अजित पवारांची गाडी सुसाट…

Untitled Design   2023 04 23T225752.796

Ajit Pawar’s car rustled संपत मोरे (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या कामाच्या शैलीसाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा कमालीचा असून कामाची सुरुवातही ते सकाळी खूप लवकर करतात. आपल्या वेळेचा अत्यंत कुशल पद्धतीनं वापर कसा करायचा हे अगदी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून शिकावे, असेच त्यांचं ‘टाईम मॅनेजमेंट’ आहे. त्यांच्या कामाचा झपाटा हा कायमचाच प्रचंडच असतो. मग ते सत्तेत असू देत किंवा विरोधकांमध्ये. दिवसभरातील प्रत्येक मिनिटाचा वापर विकास कामांसाठीच व्हावा असा हट्टाहास अजित पवारांचा नेहमीच असतो. अनेकदा तर त्यांच्या कार्यक्रमात काही अधिकाऱ्यांची अक्षरशा दमछाक होतानाही अनेकांनी पाहिली आहे.

आजही रविवारचा दिवस असला तरी अजित दादांचे सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे नियोजित कार्यक्रम ठरले होते. साधारण संध्याकाळची पावणेसातची वेळ होती. वारजे येथील दांगट कुटुंबियांच्या व्यवसायिक कार्यालयाच्या उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम आटपून घाईघाईने अजित पवार पुढील कार्यक्रमास मार्गस्थ होतात आणि नेहमी प्रमाणे माध्यमांचे प्रतिनिधी अजित दादांची मुलाखत घेण्यासाठी पुढे सरसावतात. तितक्याच लगबगीने दादा ताफ्यातील गाडीत बसताना माध्यम प्रतिनिधी यांना प्रतिउत्तर देऊन म्हणतात “मला आता काही बोलायचं नाही विषय संपला आहे…!” आणि आपल्या पीएला ला पुढे बसण्यास सूचनाही करतात. तितक्यात माध्यम प्रतिनिधी मंडळींकडून आवाज येतो “दादा सावकाश जा…!” अजित दादा ही त्याच जोशात प्रतिउत्तर देतात “अरे बाबा, सावकाश हा शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाही…!” आणि अजित दादांची गाडी पुढील कार्यक्रमास सुसाट जाते.

वंचित आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; पवार थेट बोलले

सध्या तर अजित पवारांच्या नियोजित कार्यक्रमातून एखादा कार्यक्रम जरी चुकवला तर त्याची बातमी व्हायला वेळ लागत नाही. याचाच धसका त्यांनी घेतलाय की काय, असे म्हणायला हरकत नाही. कारण काही दिवसापासून वातावरणात उष्णता वाढलीय तसेच राजकारणातील वातावरण देखील हळूहळू तापायला लागले आहे.

Tags

follow us