२०२२ वर्ष राज्यातील या राजकीय घटनांची गाजलं

  • Written By: Published:
२०२२ वर्ष राज्यातील या राजकीय घटनांची गाजलं

प्रफुल्ल साळुंखे : २०२२ हे वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणासाठी अतिशय धक्कादायक ठरलं. अभूतपूर्व असं सत्ताबदल जे देशभरात गाजलं. यासह अनेक घडामोडीची नोंद इतिहासात झाली.

नवाब मलिकांना अटक

वर्षाच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. दाऊद इब्राहिम यांची ३०० कोटीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांनतर ते अजूनही तुरुंगात आहेत.

रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा

२६ फेब्रूवारी रोजी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला. २०१५ ते २०१९ या काळात अनेक नेत्याचे पत्रकार यांचे फोन टॉप केल्याचे आरोप शुक्ला यांच्यावर होते. विधानसभेत नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

विधानसभेत पेनड्राइव्ह

२४ मार्चच्या दिवशी मुंबई अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह समोर आणत राजकीय खळबळ उडवून दिली. सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे कसे आपल्याला खोट्या केस मध्ये अडकवत आहेत. याची सीसीटीव्ही कॅमेरा, ऑडियो क्लिप त्यांनी सभागृहात ऐकवली. या मागे सरकारचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्यावर गृहमंत्री दिलीप वळसे यांनी प्रवीण चव्हाण यांची बदली करत, चौकशी समिती नेमली.

अनिल परब यांना अटक

१ जूनच्या दिवशी अनिल परब यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली. साई रिसॉर्ट मनीलॉंड्रीग प्रकरणाचा पैसा असल्याचं आरोप होता. १५ जुलै आणि सप्टेंबर महिन्यात ईडी चा ससेमिरा हा अनिल परब यांच्या मागे लागला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या एकामागून एक आरोप करत परब यांना जेरीस आणत होते.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक

११ जून राज्यात राज्यसभा निवडणुकीत बहुमत नसताना तीन उमेदवार निवडून आणत सरकारला धक्का दिला. भाजपाच्या धनंजय महाडिक यांना वीस मत कमी असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी ती खेचून आणत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला.

यात सावरत नाही तोच धक्यामागुन धक्के देत भाजपने राजकीय चमत्कार केला. विधान परिषदेत प्रसाद लाड यांच्या रूपाने पाचवा उमेदवार निवडून आणला. भाजपा कडे असलेल्या मतानुसार प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांचा विजय निश्चित होता. असं असताना भाजपने लाड यांच्या रूपाने पाचवा उमेदवार निवडून आणला. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तातरांच्या चर्चा रंगल्या.

एकनाथ शिंदे यांचं बंड

राज्यसभा आणि विधानपरिषद यातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे चाळीस आमदरासह गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले. या मागे मोठी शक्ती असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले, त्यानंतर या बंडामागे भाजप असल्याचे समोर आले.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

२९ जून ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तात्काळ त्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं. यावेळी त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं.

मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली

३० जून रोजी अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात आली. फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील अशी शक्यता असताना तसेच थेट पत्रकार परिषद सुरू असताना दिल्लीतील पक्षश्रेष्ठीचा आदेश आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा फडणवीस यांनी केली. आपण सत्तेबाहेर राहून सरकारला सल्ला देणार अस फडणवीस यांनी जाहीर केलं. थोड्याच वेळात केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. ही राज्यातील सर्वात मोठी घडामोड होती.

संजय राऊत यांना अटक

१ ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार संजय राऊत याना ईडीने अटक केली. पत्राचाळ प्रकरणात १०३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात काही पैसे संजय राऊत यांचा जवळच्या नातेवाईक आणि बिल्डर यांच्या खात्यात वळते झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अटक झाली त्या वेळी संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख रुपये ईडीने जप्त केले होते.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार

९ ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अतिशय उत्कंठा वाढवणारा हा दिवस अखेर ठरला. या दिवशी भाजपाच्या वतीने ९ आणि शिंदे गटाच्या वतीने ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे TET प्रकरण, राठोड यांचं पूजा आत्महत्या प्रकरण, संजय शिरसाठ, बच्चू कडू यांच नाराजी नाट्य अशा अनेक प्रसंगांना एकनाथ शिंदे यांना सामोरे जावे लागले.

अनिल देशमुख यांना जामीन पण सुटका नाही

४ ऑक्टोबर आणि २२ डिसेंबर या दोन वेळी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला पण असं असूनही त्यांची सुटका झाली नाही. बदली मध्ये १०० कोटी चा घोटाळा झाल्याचा आरोप आयुक्त परमविर सिंग यांनी केला होता.

राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्य

नोव्हेंबर महिन्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या एका मागून एक विधानामुळे सरकार अडचणीत आले. मुंबई ही गुजारती व्यापारी यांच्यामुळे वाढली, असं वक्तव्य केल्यामुने शिवसेनेला आयतं कोलीत मिळालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श असे विधान करत नव्या वादाला तोंड फोडले. कोश्यारी यांचा राज्यभर निषेध करण्यात आला. राज्यपाल यांच्या राजीनाम्याविषयी शिवसेना आणि राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी मोठ आंदोलन केलं. चालूं असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटले.

संजय राऊत यांना जामीन

९ नोव्हेंबर ला संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मिळाला.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात

७ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेड जिल्ह्यातील देगलुर मध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यात्रेने नांदेडहून हिंगोलीत प्रवेश केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी विधान केलं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षाही शिवसेनेला चांगलं कोंडीत पकडल.

सुषमा अंधारे यांचं वादळ

शिवसेनेतले अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असताना सुषमा अंधारे यांनी सेनेत प्रवेश केला. संजय राऊत जेल मध्ये असताना सुषमा अंधारे यात्रा काढत भाजपा आणि शिंदे सरकारला अक्षरशः जेरीस आणलं. पतीचे आरोप, जुने व्हिडिओ, गुन्हे दाखल करून देखील अंधारे घाबरल्या नाहीत अंधारे यांच्या रूपाने शिवसेनेला एक रणरागिणी मिळाली.

एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप

२० डिसेंबर थेट एकनाथ शिंदे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला. NIT संस्थेचा ८० कोटी रुपयांचे १६ भूखंड मुख्यमंत्री यांनी केवळ २ कोटी रुपयांना दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. विरोधकांनी आक्रमक होत एक आठवडा सभागृहाचं कामकाज प्रभावित केलं.

दिशा सालियन प्रकरण

२३ डिसेंबर दिशा सालियन हिच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच भूत पुन्हा आदित्य ठाकरे यांच्या मानगुटीवर बसले. जमीन घोटाळ्याचा आरोप वरून शिंदे सरकार जेरीस आलेले असताना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान हिच्या मृत्यू नंतर AU नावाने आलेले कॉल कोणाचे याची चौकशी करण्याची मागणी केली. भाजप आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण लावून धरले. देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी मार्फत या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले.

सीमावादाचा ठराव

२७ डिसेंबर रोजी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या महारष्ट्र कर्नाटक सीमावाद बाबत महारष्ट्र सरकारने विधिमंडळात ठराव समंत केला. कर्नाटक सरकारने सीमा भागात चालवलेल्या अत्याचाराबाबत दोन्ही राज्यात वाद निर्माण झाले. या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक झाली, पण वाद मिटला नाही. अखेर महाराष्ट्र विधिमंडळात कर्नाटक सीमा भागातील बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्या संदर्भातील ठराव एक मताने विधानसभेत मंजूर

अनिल देशमुख यांची सुटका

२७ डिसेंबर माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांची जामिनावर सुटका केल्यानंतर त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. पण नंतर न्यायालयाने आदेश देत त्यांना सुटका करण्यास सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube