अखेर मुंडे बहिण-भाऊ एकत्र, वैद्यनाथ कारखाना बिनविरोध
Vaidyanath Cooperative Sugar Factory Election Unopposed : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अनेकदा हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. मात्र, बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत या बहिण भावांनी एकत्र येत ऊस उत्पादकांच्या हितासाठी 21 संचालकांची बिनविरोध निवड केली आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. धनंजय मुंडे त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत होते. पण, सहकारात राजकारण नको, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे; असा राजकीय तडजोडीचा पवित्रा घेऊन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संघर्ष टाळला. या निवडणुकीसाठी पंकजा गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण एकत्र आले. त्यामुळे 21 सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले.
जळगावमध्ये बॅंकेवर सिनेस्टाईल दरोडा, 17 लाखांची रोकड अन् सोनं लुटलं
कारखाना संचालक पदाच्या 21 जागांसाठी 9 मे रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले होते. संचालक पदाच्या 21 जागांसाठी एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज फेटाळण्यात आले. तर 37 अर्ज स्वीकारण्यात आले.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रीतम मुंडे, फुलचंद कराड यांच्यासह 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक होते. त्यामुळे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले. पंकजा मुंडे गटाकडून 11 तर धनंजय मुंडे गटाकडून 10 उमेदवार आहेत.
बिनविरोध निवडून 21 उमेदवार –
पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, रेशम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतू करडा, शिवाजीराव गुट्टे, शिवाजी मोरे , सुधाकर सिंगारे , सत्यभामा उत्तमराव आघाव , मंचक घोबाळे.