Uddhav Thackeray : चोरांना घेऊन भाजप निवडणूक लढवणार का?

Uddhav Thackeray : चोरांना घेऊन भाजप निवडणूक लढवणार का?

Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जे मी घरात बसून केले. ते या मिंध्ये सरकारला सुरत, गुवाहाटीला जाऊनही करता येत नाही. केवळ चोरी करणे एवढेच यांचा उद्योग आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले आहेत. आता माझा बाप चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सरकार चालवत आहे. मग मी आता भाजपला विचारतो की तुम्ही या ४० चोरांना घेऊन निवडणूक लढवणार आहेत का, हे एकदा जाहीर करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, काँगेसचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाप चोरणारं दिवटं आपल्या पोटी जन्माले आलं, हे जेव्हा त्या मिंधेच्या आई-वडिलांना कळाले तेव्हा काय वाटले असेल. अशी चोरटी औलाद आपल्या महाराष्ट्रात फिरत आहेत. या चोरट्या औलादीना आपल्याला घरी पाठवावे लागणार आहे. यांची मस्ती जिरवण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमुठ वळली आहे.

…तर पक्षाचे नाव बदलून ‘भ्रष्ट जन पार्टी’ ठेवा; उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमधून हल्लाबोल – Letsupp

सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवर भाषा बोलत आहेत. तो अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांची हिंदुत्व शब्द उच्चरायची लायकी नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली.

आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही. जो माणूस प्रश्न विचारेल त्याला जेलमध्ये टाकायचे, एवढेच काय ते भाजप काम करत आहे. आम्हाला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube

follow us
  • fb
  • instagram
  • youtube