पवारांना इथून उपटून…, गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर विषारी टीका

पवारांना इथून उपटून…, गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर विषारी टीका

औरंगाबाद : मी पवारांना इथून उपटून टाकणार असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पत्रकार परिषदेत दिलंय. ते औरंगाबादमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना पवार घराण्यावर विषारी टीका केली आहे.

ते म्हणाले, अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती घेतलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

सत्तेत यायचं आणि सत्तेच्या चाव्या ताब्यात घ्यायचे, अरेरावीची भाषा करायची यांना सगळ्यांना सरळ करण्याचं काम मी करणार आहे. तुम्ही फक्त पाठबळ द्या, नाही त्यांना बेजार केलं तर माझं नाव गोपीचंद पडळकर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पवारांना बोलायला लोक घाबरतात, नीती खुंटली का तुमची. तुम्हांला माहिती आहे, मी कुणाला बोलायला घाबरत नाही. ही लोक आमच्यामुळे मोठी झाली आहे. ज्या पद्धतीने फुले, शाहु-आंबेडकर यांचं नाव घेऊन बहुजनांवर अन्याय केला, हे पाप करण्यात पवार कुटुंबीय नंबर वनवर असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

पवार कुटुंबियांनी आपल्याला वर येऊ दिलं नाही, दुष्काळी पट्यात त्यांनी काम केलं नाही. लोकांना पाणी दिलं नाही, तसंच, आठवले-कवाडे आणि शिंदे गट युतीवर बोलण्यास मी खूप छोटा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

दरम्यान, बाळासाहेब आंबेडकर यांचे ही समाजात मोठे स्थान आहे. त्यांची ताकद मला माहित आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सोबत जाऊन माती केली आहे. त्यामुळे त्यांना यातून बाहेर यायला अनेक वर्षे लागतील.

छोट्या छोट्या समूहाच्या राजकीय गटांना महत्त्व येणार आहे. मात्र, तरुणांनी आपले भवितव्य ओळखले पाहिजे, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली. आता गोपीचंद पडळकर यांच्या प्रत्यत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube