18 पैकी 18 उमदेवार विजयी, वडवणीत मविआची एकहाती सत्ता, पंकजा मुंडेंना धक्का

18 पैकी 18 उमदेवार विजयी, वडवणीत मविआची एकहाती सत्ता, पंकजा मुंडेंना धक्का

Vadwani Agricultural Produce Market Committee Result वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Vadwani Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके (NCP MLA Prakash Solunke), माजी आमदार केशव आंधळे (Former MLA Keshav Andhale) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने सर्व 18 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये पंकज मुंडेना मोठा पराभव स्विकारावा लागला. कारण, भाजप प्रणित विरोधी पॅनलला इथे एकही जागा जिंकता आली नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुध्द भाजपच्या (BJP) पॅनलमध्ये इथे थेट लढत होती. या लढतीत राष्ट्रवादीच्या पॅनलने भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवून एकहाती वर्चस्व मिळवलं.

राष्ट्रवादीच आमदार प्रकाश सोळुंके व माजी आमदार केशव आंधळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल तर त्यांच्या विरोधात राजाभाऊ मुंडे यांचे पॅनल होते. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळं दोन्ही पॅनलमध्ये जोरदार लढत होईल, असे अपेक्षित होते. मात्र, महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धूळ चारून उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.

भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असून महाविकास आघाडीने मात्र जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत आघाडी घेतल्याचं चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने. वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व 18 सदस्य विजयी झाले. या विजयाचे वाटेकरी असलेल्या सर्व कार्यकर्ते व मतदारांचे अभिनंदर, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी आनंद व्यक्त केला.

विजयी उमेदवार
सोसायटी मतदार संघ –
1. खोटे रोहिदास अश्रुबा
2. गरड शिवाजी आनंदराव
3. नाईकवाडे नंदकुमार निवृत्ती
4. मस्के दिनेश बन्सीधरराव
5. शेळके प्रदीप राजेंद्र
6. शिंदे अमरसिंह पंजाबराव
7. शिंदे शिवाजी मुरलीएधर
8. शेख दिलशादबी समशेर
9. शेळके अनुराधा नारायण
10. चोले अनिल अश्रुबा
11. शिंदे विश्वनाथ भगवान.

APMC Election छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात, महाविकास आघाडीला धक्का</a>

ग्रामपंचायत मतदार संघ
बादाडे अतुल बंडू
लंगडे सचिन सुखदेवराव
मांजरे बबन धुराजी
कदम अभिमान अर्जून

व्यापारी मतदार संघ
अंडील पांडुरंग अंबादास
धस रणजीत मधुकर
साळवे भिकाराम धर्मराज

 

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube