साहेब माझा राजीनामा आपण स्विकारावा…, खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधीत लढलेल्या दरेकर यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात उबाठामधून उमेदवारी घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

News Photo   2026 08 03T173639.286

शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र आहे. गेल्याच महिन्यात ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरेंच्या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करत उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यानंतर, या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आता, ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात उबाठामधून उमेदवारी घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता वैयक्तिक कारणास्तव आपण पक्षाच्या कामाला वेळ देऊ शकत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

साहेब, मी वैशाली दरेकर राणे, महिला जिल्हासंघटक या पदावर दोन वर्षापासून कार्यरत आहे. परंतु, सध्या माझ्या वैयक्तिक कर्तव्यांमुळे मी सदर पदाला न्याय आणि वेळ देऊ शकत नाही. म्हणून, माझ्या महिला जिल्हा संघटक या पदाचा मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार करावा ही विनंती, असा मजकूर वैशाली दरेकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिला आहे.

follow us