Vijay Wadettiwar : आशिष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा, त्यांची भूमिका महत्वाची नाही

  • Written By: Published:
Untitled Design

मुंबई : आशिष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा, अशी त्याची भूमिका आहे. ते काय म्हणतात हे सध्या महत्वाचा नाही. परंतु भाजप म्हणतंय कि राहुल गांधींच्या वक्त्यव्यामुळे जर ओबीसींचा अपमान झाला असेल तर आता निरव व ललित मोदींना भारतात त्यांनी आणलं पाहिजे आणि ते चोर नाही सिद्ध केलं पाहिजे. तसेच ओबोसी समाजाने निरव व ललित मोदी चोर नसतील तर त्यांना आपले नेते मानले पाहिजे. तुम्ही कितीही वेळा भारताला लुटून जा पण भारतात परत या कारण ओबीसी जनता तुमच्या दर्शनासाठी आतुर झाली आहे असा टोला विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी जाणतेसह भाजपला लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी यांनी निरव व ललित मोदींना चोर म्हटल्यामुळे आता भाजपाची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे आता ओबीसी नेता म्हणून भाजपला आता त्यांच्यासाठी ललित व निरव मोदी यांनी प्रचार करण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही लवकर भारतात या असे देखील यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले. निरव व ललित मोदीने प्रचार केला तरच भारतात भाजप निवडून येईल. भाजपला आता ललित व निरव खूप महत्वाचे झाले आहे. आता भाजपने या दोघांचा फोटो लावावा आणि त्याला रोज अगरबत्ती लावावी असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.

व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने तयार केली अंधभक्तांची फौज; अजितदादा म्हणाले, सावध राहा ! 

भारतातील राजकारण आता कुठल्या दिषेने चालले आहे. इथे चोराला चोर म्हणूनये, गुंडाळा गुंड म्हणूनये आणि म्हटलंच तर हा नवा जावई शोध या देशामध्ये लावला गेला आहे. भाजपने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून या देशातील लोकशाहीचा अंत केला आहे. आता आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. देशातील संविधान मानायचं नाही. याच्यावर आम्ही आहोत असे भाजला वाटते. कायदा फक्त विरोधांना लागू होता अशी परिस्थिती या देशात आली आहे. सत्तेच्या माध्यमातून सर्व विरोधक गप्प करण्याचं काम भाजप करत आहे असा आरोप यावेळी वडेट्टीवारांनी केला.

follow us