आमच्या पोलिसांचं अभिनंदन! पण नाशिकच्या पोलिसांचे.., खरात प्रकरणावर काय म्हणाले मंत्री विखे पाटील?
खर तर शिर्डी पोलिसांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी ही गोष्ट सर्वात अगोदर समोर आणली. त्यांनी याबाबत गुन्हा दाखलं केला.
नाशिकचे कॅप्टन खरात यांच्या महिलांसोबत असलेल्या (Kharat) अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा अत्यंत वस्तुनिष्ठ व गोपनीय पद्धतीने तपास करून सत्य बाहेर आणल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन केलं आहे.
खर तर शिर्डी पोलिसांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी ही गोष्ट सर्वात अगोदर समोर आणली. त्यांनी याबाबत गुन्हा दाखलं केला. त्यांच्या कारवाईनंतर पुन्हा चक्र फिरायला लागली असं म्हणत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांचं कौतूक केलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तात्काळ दखल घेत लुकआउट नोटीस काढली असंही विखे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?