नाशिकमध्ये राजकीय ड्रामा, थोरात होते तरी कुठे ?
अहमदनगर : सस्पेंस असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आला आहे. मात्र यामध्ये थोरात होते तरी कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत यावर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचा मुहूर्त निवडण्यात आल्याची माहिती तांबे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नसल्यामुळे भाजपमध्ये गोंधळ सुरू होता.
दुसरीकडे काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर होऊनही ते अर्ज दाखल करीत नसल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीचा सस्पेन्स वाढला होता. त्यांनी पक्षाचा आदेश मोडला पदवधीरच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबेंऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने भाजपसह काँग्रेसचे कार्यकर्तेही गोंधळले होते.
काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे . सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवाराबाबत अर्ज भरण्यापर्यंत गुपीत कायम राहिले होते.
कॉंग्रेसचे सत्यजीत तांबे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची ऑफर असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार असतील काय? याबाबत चर्चा सुरू होती. त्यातच कॉंग्रेसतर्फे सुधीर तांबे यांची अधिकृत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केली. त्यामुळे ते कॉंगेसचे उमेदवार असतील असे जाहीर झाले.
मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुधीर तांबे व सत्यजीत तांबे सोबत गेले. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. सत्यजीत तांबे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यात एक कॉंग्रेसतर्फे तर एक अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावाचा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचे सागंण्यात सांगण्यात आले आहे.