Thackeray vs shinde : शिवसेना कोणाची : एकनाथ शिंदे यांचे पद बेकायदेशीर, ठाकरे गटाचा दावा

  • Written By: Published:
Thackeray vs shinde : शिवसेना कोणाची : एकनाथ शिंदे यांचे पद बेकायदेशीर, ठाकरे गटाचा दावा

मुंबई : प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गटाचे वकील देवदत्त कामत (Devdatta Kamat) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्यात निवडणूक आयोगासमोरच जोरदार वादावादी झाली. आखेर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. दोन्ही गटांच्या वकिलांनी आक्रमकपणे दावे-प्रतिदावे, आक्षेप घेतल्याने जवळपास अर्धा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला तंबी देत शांत राहण्याचे सूचना केल्याने आखेर वाद थांबला. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे पद बेकायदेशीर असल्याचा ठाकरे गटाने दावा केला आहे.

उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्ब्ल यांनी एक तास दहा मिनिटे तर वकील देवदत्त कामत यांनी दीड तासाहून अधिक असे जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ बाजू मांडली. तर एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी महेश जेठमलानी, निहार ठाकरे आणि मनिंदर सिंग उपस्थित होते. महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी अर्धा तास युक्तिवाद केला.

ठाकरे-शिंदे या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आजही अंतिम निर्णय दिला नाही. पुढील सुनावणी आता सोमवारी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद

– पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्याआधी पक्षनेते पद निवडण्यासाठी प्रतिनिधी सभेला परवानगी द्या.
– एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे संघटनात्मक संख्याबळ जास्त आहे.
– एकनाथ शिंदे गटाने आतापर्यंत कोणतीही प्रतिनिधी सभा घेतलेली नाही.
– प्रतिनिधी सभेला सर्व अधिकार दिले आहेत. प्रतिनिधी सभा आमच्या सोबत आहे.
– प्रतिनिधी सभाच अंतिम निर्णय घेऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला कोणताही अधिकार देऊ नये.
– एकनाथ शिंदे यांचा गट हा मुळात राजकीय पक्ष नाही.
– मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद बेकायदेशीर आहे. पक्षाची घटनाच सर्वोच्च आहे.
– सादिक आली केस याठिकाणी लागू होत नाही.
– मूळ पक्ष आम्ही, त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळावे.
– उद्धव ठाकरे यांचा पक्षनेते पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या.
– जर एकनाथ शिंदे गटाने प्रतिनिधी सभा घेतली तर ती सभाच बेकायदेशीर असेल.
– बंडखोर सर्व आमदार मूळ पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. त्यामुळे नंतर निर्णय कसे बदलू शकतात. पक्षाची घटना शिंदे गटाला बंधनकारक आहे.
– एकनाथ शिंदे शिवसेनेत होते. त्यामुळे शिवसेना पक्ष बोगस कसे म्हणतात.

एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद/आक्षेप

– प्रतिनिधी सभा फक्त तुमच्याकडे कशी असू शकते. ती आम्ही पण घेऊ शकतो.
– उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी कशी स्थापन केली. त्याबाबत ठोस कारण त्यांनी दिले नाही. त्यामुळे त्यांनी मतदारांना वाऱ्यावर सोडले.
– लोकसभा, विधानसभा सदस्य संख्या पाहता धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच द्या.
– शिवसेना पक्षाच्या घटनेचे आम्ही पालन केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube