‘त्या’ जाहिरातीवर बाळासाहेबांचा फोटो का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले थेट उत्तर
Eknath Shinde on Shivsena Advertisement : राज्यातील वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही जाहिरात सरकारची नाही. जाहिरातीपेक्षा लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. हे या माध्यमातून दिसून आले आहे. आम्ही आमचे काम करत राहू. विरोधक आरोप करत राहतात. आरोपांना आम्ही आरोपांनी उत्तर देणार नाही. जेवढे आमच्यावर आरोप केले जातील, त्यापेक्षा आम्ही दुप्पटीने काम करत राहू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे सांगितले.
राज्यातील सर्व वर्तमानपत्रात आलेली जाहिरात राज्य सरकारने दिलेली होती का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की ही जाहिरात राज्य सरकारने दिलेली नाही. परंतु लोकप्रिय मुख्यमंत्री हे श्रेय माझ्या एकट्याचे नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे श्रेय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘त्या’ जाहिरातीवरुन शिवसेनेचा यू टर्न, आमच्या पक्षाचा संबंध नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने आमच्या योजनांना पाठबळ दिले आहे. त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करु शकतो. मागील अडीच वर्षात बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय. मुंबईपासून राज्यभरातील सर्व प्रकल्प लाखो लोकांना दिलासा देणारा आहे. त्यामुळेच जनतेने आमच्या युती सरकारला पसंती दिलेली आहे. हे माझे एकट्याचे श्रेय नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंनी केले शिंदेंच्या शिवसेनेचे कौतुक; म्हणाल्या, कमी मार्कात पास होणारा…
कोल्हापूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीड लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंद झाली. 60 हजार पेक्षा अधिक नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी आले होते. ‘शासन आपल्या दारी’ म्हणजे राज्य सरकारच्या योजना ह्या थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लोकांना शासन दरबारी चकरा माराव्या लागू नयेत म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या मंत्रिमंडळाने ही अभिनव संकल्पना तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात या कार्यक्रमाची मागणी आहे. जिल्हाधिकारी, तहसिलदार, तलाठी असे पूर्ण शासकीय यंत्रणा गावागावात लाभार्थ्यांची नोंद घ्यायला जात आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.