Balasaheb Thorat यांना भाजपात प्रवेश देणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Balasaheb Thorat यांना भाजपात प्रवेश देणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankile) यांनी मोठं विधान केलंय. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं सांगून त्यांनी सत्यजित तांबेंसह (Satyajit Tambe)बाळासाहेब थोरात यांना एक प्रकारे थेट ऑफरच दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, स्थानिक पातळीवर सत्यजित तांबेंना मदत करुन त्यांना विधानपरिषदेत भाजपनं मदत केली. त्यामुळं सत्यजित तांबेंना आम्ही ऑफर दिलेली नाही, पण त्यांना जर वाटलं तर भाजपत त्यांना प्रवेश करायचा आहे. तर त्यांचं स्वागत केलंय, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

आम्ही आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहोत आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणे पण सत्ता हे आमच्यासाठी साध्य नाही साधन आहे हा भाजपचा मूलमंत्र आहे. बाळासाहेब थोरातांना मी व्यक्तिगत ओळखतो, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले.

ते म्हणाले की, त्यांच्या रक्तात काँग्रेस असून त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलंय, अशावेळी नेतृत्वाला नाराजी येत असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असंही यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube