Pune : मस्करी जीवावर बेतली! गुदद्वारात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू

Pune : मस्करी जीवावर बेतली! गुदद्वारात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू

पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत गुदद्वारात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोतीलाल साहू (16) असे मृत मुलाचे नाव आहे. तर धीरजसिंग गोपालसिंग गौड (21) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) बडगाव येथील रहिवासी आणि मृत मुलाचा मामा शंकरदिन रामदिन साहू यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मस्करीमध्ये हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. (A minor boy died on the spot after being filled with air in his anus while working in the company)

याबाबत अधिक माहिती अशी की,शंकरदिन, भाचा मोतीलाल आणि आरोपी धीरज सिंग हे तिघेही हडपसर इंडस्ट्रियल एरियामधील ‘पुना फ्लोअर अँड फूड्स’ कंपनीत काम करतात. धीरज सिंग आणि मोतीलाला हे कंपनीत दुसऱ्या मजल्यावर काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती. त्याचवेळी अचानक आरोपीने मोतीलालला पकडले आणि हवेचा कॉम्प्रेसर सुरू केला. या कॉम्प्रेसरचा पाईप त्याने मोतीलालच्या गुद्द्वाराला लावून त्याच्या शरीरात हवा भरली.

आर्थिक पिळवणूक थांबणार; ऑनलाइन सातबारा-फेरफारसाठी आता शुल्क निश्चित

हवा पोटात गेल्याने आणि दाब प्रचंड असल्याने मोतीलालच्या शरीरात गंभीर अंतर्गत इजा झाली. यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मोतीलालचा तडफडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी धीरजसिंगला ताब्यात घेतले. त्यानंतर लेखी तक्रार दाखल होताच हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. दरम्यान, मस्करीत केलेल्या या घटनेचा परिणाम एवढा गंभीर होईल याची कल्पना नसल्याचे त्याचे मत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube