कपिल शर्माचा एका उच्चभ्रू महिलेला रात्रभर फोन? पतीलाही शिवीगाळ केल्याचा पीडितेचा दावा…
Kapil Sharma : अभिनेता कपिल शर्माच्या नावाने फोन करुन (Kapil Sharma ) एका महिलेचा विनयभंग केल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका उच्च उच्चभ्रू महिलनेला फोन करुन विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कपिल शर्मा विरोधात 354 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘अमृता सिंगची मुलगी सारा अली खानबद्दल बेधडक वक्तव्य’; म्हणाली ‘माझ्यासारखं लग्न केलं तर…’
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिला पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील महिला मेरी शॉर्ट स्मार्ट वर्क इमारतीमध्ये राहत असून या महिलेला अभिनेता कपिल शर्माच्या नावाने फोन आला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास फोन करुन में कपिल शर्मा बात कर रहा हु… पहचाना नही…उस दिन तो नाईट को हॉटेल आये मिले थे… असं म्हणत महिलेचा विनयभंग केला आहे. आरोपीने रात्रीच्यावेळी तब्बल 10 वेळा फोन केल्याचा दावा पीडित महिलेकडून करण्यात आला आहे.
IFFI मध्ये अदितीचाच बोलबाला; एक मुकपट तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार
एवढंच नाहीतर पीडित महिलेच्या पतीलाही फोन करुन तुमची बायको ओयोमध्ये काम करुन चुकीचं काम करीत आहे… असं म्हणत आरोपीने फोन करुन पतीला शिवीगाळ केल्याचा दावा पीडित महिलेकडून करण्यात आला आहे.
भारत-पाक मॅच अन् शिंदेंच्या शिलेदाराला 35 लाखांचा गंडा : दीड महिन्यानंतर घेतली पोलिसांची मदत
दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेने तत्काळ येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेत विनयभंगाची तक्रार केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर येरवडा पोलिसांकडून तो फोन करणारा व्यक्ती कोण? याचा तपास घेण्यात येत आहे.
याआधीही अनेकदा कपिल शर्मा अडचणीत :
शोमध्ये एका रस्त्यांवरुन भाष्य करीत गर्भवती महिलांविरोधात कपिल शर्माने आक्षेपार्ह विधान केलं होतं. शर्माच्या या विधानावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट दिला खरा पण महिला आयोगाने कपिलच्या या विधानावर आक्षेप घेतला. कपिलच्या विधानावर बोट ठेवत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महिला आयोगाकडून कपिलला नोटीसही पाठवण्यात आली होती.