‘अमृता सिंगचं लेक सारा अली खानबद्दल बेधडक वक्तव्य’; म्हणाली ‘माझ्यासारखं लग्न केलं तर…’
Amrita singh: अभिनेत्री सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची लेक आहे. सैफशी घटस्फोट झाल्यानंतर अमृतानेच सारा आणि इब्राहिमला लहानाचं मोठं केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत बिनधास्त अभिनेत्री म्हणून अमृता सिंगकडे पाहिलं जातं. (Sara Ali Khan) अमृताच्या गुपचूप लग्नाने चाहत्यांना आनंद झाला होता, पण हे अमृता आणि सैफ अली एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. अमृता सिंग तिच्या लग्नाला चुकीचे मानते. अनेक मुलाखतींमध्ये तिने याबद्दल भाष्य करताना बघायला मिळाली आहे.
View this post on Instagram
अमृता सिंगने मुलाखतींमध्ये तिच्या लग्नाबद्दल बोलले आहे. त्याच्या अयशस्वी लग्नाची बरीच जोरदार चर्चा झाली आहे. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न केले. त्याचा परिणाम असा झाला की, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. यानंतर, सारा आणि इब्राहिमच्या जन्मानंतर 13 वर्षांनी अखेर त्यांच्या नात्याला पूर्ण विराम मिळाला.
अमृता सिंगने सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. लग्नानंतरच तिने मनोरंजन क्षेत्राला रामराम केला आणि आपल्या कौटुंबिक जीवनाकडे पूर्ण लक्ष दिले. पण, त्या काळात सैफ त्याच्या करिअरला सुरुवात करत होता आणि वेगवेगळ्या हिरोइन्ससोबत चित्रपट करत होता. अमृताला हे अजिबात मान्य नव्हते आणि दोघांमध्ये सतत भांडण सुरू झाले.
IFFI मध्ये अदितीचाच बोलबाला; एक मुकपट तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार
एका मुलाखतीदरम्यान अमृता सिंगने तिच्या लग्नाविषयी सांगितले होते. यामध्ये तिने सांगितले होते की, जर तिच्या मुलीनेही तिच्यासारखे गुपचूप लग्न करण्याची चूक केली तर ती तिला कानाखाली मारेल. तिने आयुष्यात केलेल्या चुका आपल्या मुलांनी पुन्हा घडवाव्यात असे तिला वाटत नाही. या चुकीमुळे आज अमृता सिंग खडतर आयुष्य जगत आहे. मात्र सैफ अली खान अभिनेत्री करीना कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.