दिलीपराव सत्तेसाठी हपापलेले नाहीत, वळसे पाटलांच्या बचावासाठी जुना मित्र आला धावून

  • Written By: Published:
दिलीपराव सत्तेसाठी हपापलेले नाहीत, वळसे पाटलांच्या बचावासाठी जुना मित्र आला धावून

Aadhalrao Patil And Dilip Valse Patil:  अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील बंडानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे (Sharada Pawar) विश्वासू असलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका होऊ लागली. परंतु त्यांच्या बचावासाठी त्यांचे जुने मित्र आणि राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao Patil) पुढे आले आहेत. आढळराव पाटील म्हणतात “दिलीपराव माझे राजकिय विरोधक असले तरी जुने मित्र आहेत, मी त्यांना चांगले ओळखतो. माझ्या माहितीनुसार सत्तेसाठी व पदासाठी ते हपापलेले नाहीत. वळसे पाटील यांचा अजितदादा यांच्या गटात प्रवेश फक्त जनतेच्या व तालुक्याच्या हितासाठीच” आहे.  (Aadhalrao Patil came to save Dilip Valse Patil)

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणतात दिलीपराव युतीत सहभागी झाले याचा मला आनंद आहे. यापुढे आम्ही दोघे मतदारसंघात सोबत काम करू असे आमचे बोलणे झाले आहे. तसेच लोकांना माहित आहे दहा – पंधरा वर्ष आम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. मग ते तालुक्यासाठी असो किंवा भीमाशंकर साखर कारखान्यासाठी असो. मी खूप दिवस दिलीपरावांबरोबर म्हणून मी त्यांना चांगला ओळखतो. त्यांनी जो सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तो फक्त मतदार संघाच्या हितासाठी घेतला आहे. कुणी काही म्हणो परंतु दिलीपराव हे सत्तेसाठी व पदासाठी हपापलेले नाहीत.

PM केअर फंडातील पैशाचं काय झालं? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट सवाल

तालुक्यातील लोकांचे काम व्हावेत म्हणून ते आज अजित पवारांसोबत सत्तेत गेले आहेत. उदाहरण द्याच म्हंटल ता डिंबे धरणाचा पाणी पाईपलाईन द्वारे जुन्नर वरून नगरला जातंय यामुळे आंबेगाव तालुक्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. ते पाणी आंबेगावला मिळून देण्यासाठी दिलीपराव सत्तेत सहभागी झाले असावेत असं मला वाटत. असे आढळराव पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube