PM केअर फंडातील पैशाचं काय झालं? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट सवाल

PM केअर फंडातील पैशाचं काय झालं? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट सवाल

Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने (BJP) केला होता. त्यानंतर ईडीने 21 जून रोजी जम्बो कोविड सेंटरच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. दरम्यान, यावरून आता उद्धव ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. कोरोना काळातला मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार काढाच, पण पीएम केअर फंडातील पैशाचीही चौकशी करा, अशा शब्दात भाजपला ठणकावलं. (Uddhav Thackeray On BJP inquire about money in PM Care Fund)

आज ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवालरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कोविड काळातला मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार काढा. जरूर काढा. पण, संपूर्ण जग कोरोनाने ग्रस्त असतांना मुंबईने एक आदर्श जगासमोर ठेवला की, आपन काय करू शकतो. मुंबई मॉडेलचं जगभर कौतुक झालं. मात्र, आपल्याकडून कौतुक झालं नाही. कौतुक करायला देखील मन मोठं लागतं. माणूस जिवंत असावा लागतो. तुमच्यातला माणूसच मेलेला आहे. तुम्हाला निदान कौतुक करता येत नसेल तर निदान बदनाम तरी करू नका, असं ठाकरे म्हणाले.

भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफांना ईडी कारवाईबाबत मोठा दिलासा… 

ते म्हणाले, तुम्हाला वाटतं ना, कोरोना काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला. मग कोविड काळात मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर देशातील सगळ्याच राज्यात कोविड काळात झालेल्या व्यवहाराची चौकशी करा.
पीएम केअर फंडाचं काय झालं? याचीही चौकशी करा. पीएम केअर फंडाचा पैसा कशासाठी गोळा केला होता? तो पैसा गेला तरी कुठं? याचाही चौकशी व्हायली हवी. पीएम केअर फंड कशासाठी होता, हे जनतेला कळालया हवं, असं ठाकरेंनी सुनावलं. यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, विरोधकांनी तोंड उघडली की तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना गप्प केल्याचं सत्ताधारी पक्ष करत असल्याची टीका केली.

कोरोना काळात कोविड सेंटर बनवण्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. मृतकांच्या पिशव्यांपासून अनेक वस्तूंच्या खरेदी किमती जास्त दाखवण्यात आल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर ईडीने काही दिवसांपूर्वी मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. ही सर्व छापेमारी कोरोना काळात झालेल्या कोविड सेंटरच्या घोटाळ्याशी संबंधित होती. दरम्यान, आता ठाकरेंनी मुंबईच्या कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी कराच, पण, पीएम केअर फंडाचीही चौकशी करायचं धाडस दाखवा, असं थेट चॅलेंज दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube