Letsupp Special : पळून जाऊन ललित पाटीलने आतापर्यंत 16 जणांच्या नोकऱ्या खाल्ल्या आहेत!
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या ड्रग्जच्य प्रकरणाने आणि ससूनमधून पळून जाण्याच्या घडामोडीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. तब्बल 15 दिवस ललित पाटील पुणे पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड बनला होता. पोलिसांच्या डोळ्यासमोरून पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. राजकारणी, पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील हितसंबंधांचे आरोप झाले. या सगळ्या घडामोडींमुळे पुणे पोलीस ललित पाटीलल जंग जंग पछाडत होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी ललितला ट्रॅप केले आणि चेन्नईतून अटक केली.
ललितच्या अटकेनंतर पोलिसांनी अंग झटकून तपासाला सुरुवात केली. ललितच्या पळून जाण्यामागे नेमके कोण होते, तो स्वतःहून पळून गेला की त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली अशा अनेक गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरु केला. तपासादरम्यान या प्रकरणात ससून रुग्णालयापासून येरवडा कारागृहापर्यंत अनेक बड्या नेत्यांची नावे पुढे आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ललितसह 15 जणांना अटक केली आहे. (After Lalit Patil’s escape, action has been taken against 16 people so far.)
दुसऱ्या बाजूला ललितच्या एका पळून जाण्याच्या घटनेनंतर अनेकांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ही संख्या जवळपास दीड डझनच्या घरात आहे. यात ससूनच्या प्रमुख पदापासूनच्या व्यक्तीपासून ते पोलीस शिपायापर्यंतच्या वक्तींचा समावेश आहे. ललितच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर आणि साथीदारांवरही या प्रकरणात कारवाई झाली आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.
ललित पाटीलने 16 जणांच्या नोकऱ्या खाल्ल्या :
संजीव ठाकूर : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता होते. ललित पाटील पळून गेल्यानंतर त्यांच्याविरोधात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून चौकशी लावण्यात आली होती. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांची अधिष्ठाता पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते – उपचारासाठी दाखल झालेल्या ललित पाटीलचा ससूनमध्ये सतत मुक्काम वाढविणे आणि पळून जाताना मदत केल्याचे उघडकीस आल्याने प्रविण देवकाते यांना सुरुवातीला निलंबित करण्यात आले आणि नंतर त्यांना अटकही करण्यात आली.
राजळेंना शह देण्यासाठी ढाकणे झाले अॅक्टिव्ह; रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप
कारागृह समुपदेशक सुधाकर इंगळे – चौकशीदरम्यान, कारागृहाचे कनेक्शनही समोर आले. ललितला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस करण्यात इंगळे यांचा हात असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
येरवडा कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे – सुधाकर इंगळे यांच्याकडे केलेल्या चौकशीत डॉ. संजय मरसाळे यांचे नाव समोर आले. डॉ. मरसाळे यांनी ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी फोनवर संपर्क केल्याची माहिती पुढे आली आहे. मरसाळे यांनाही अटक केली आहे.
ससूनमधील अन्य दोन कर्मचारी – याशिवाय ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते, ससूनचा कॅन्टिन चालक रौफ शेख यांनाही अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत 10 पोलिसांवर कारवाई :
आतापर्यंत या प्रकरणात पुणे पोलीस दलातील दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात पोलीस नाईक नाथाराम भारत काळे, पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव, कारागृह रक्षक मोईस अहमद शेख यांना बडतर्फ करुन अटक करण्यात आली आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, सहाय्यक फौजदार जनार्दन काळे यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवायअन्य पाच जणांचे पोलिस दलातून निलंबन करण्यात आले आहे.
‘सत्ताधारी आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी लढणार’, आरक्षणावर लंकेंचे मोठे विधान
ललित पाटीलच्या साथीदारांवर आरोपपत्र दाखल :
ललित पाटील रुग्णालयातून पळून गेल्यानंतर त्याला मदत करणाऱ्या दत्तात्रय ढोके, अर्चना निकम, प्रज्ञा कांबळे, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना यांना अटक करुन त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.