Maharashtra Politics : ‘पहाटेच्या शपथविधीवर… अजित पवारांनी ठणकावले

  • Written By: Published:
24_10_2019 Ajit Pawar_19696689

पुणे : राज्यामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु होता. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. मात्र हा प्रयोग फसला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सकाळच्या शपथविधीसंदर्भात अनेक दावे- प्रतिदावे केले जात असतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकीय खेळीचा डाव असू शकतो, असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. या शपथविधीवर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला.

महाविकास आघाडी सरकार कोसळळ्यानंतर आपण जे अगोदर केले होते (पहाटेचा शपथविधी) तेच योग्य होते, यावर अजित पवारांनी खुलासा केला, मी शपथ घेतल्यानंतर वेगळे चित्र निर्माण झाले होते. तेव्हाच मी सांगितले होते की, मी जे केले होते, त्याविषयी मी कुठलेही वक्तव्य करणार नाही. यामुळे मी आता यावर काही बोलणार नाही. मला या विषयाच्या खोलात जायचे नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

या पहाटेचा शपथविधीला ३ वर्षे झाली. झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता नवी सुरुवात झाली. आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीत ५ पैकी आम्हाला ४ जागा जिंकता मिळाल्या. लोकांनी जो विश्वास टाकला होता, त्या विश्वासाला कसा तडा जाणार नाही, याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सारखं भल्या सकाळी, भल्या सकाळी… म्हणणे योग्य नाही. सकाळची ८ वाजेची वेळ ही भली सकाळ नसते. आम्ही सकाळी ६ वाजता काम सुरु करत असतो, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us