…पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला
पुणे : काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीने सिंचन, शिखर बँकमध्ये सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एका सभेत म्हटले होते. परंतु त्यानंतर काहीच दिवसांत राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार (Ajit Pawar) हे थेट सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अनेकदा भाजपला सुनावले आहेत. तर काल जुन्या संसद भवनातही सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. या घोटाळ्यांची चौकशी करा, आम्ही शंभर टक्के सहकार्य करू, असे सुळे यांनी चॅंलेज दिले आहे. त्याला आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना थेट प्रत्युत्तर दिले आहे.
https://x.com/ChakankarSpeaks/status/1704032798246608959?s=20
याबाबत चाकणकर यांनी एक ट्वीट केले आहे. राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक-दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटते आहेत. मुळात हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे, असा हल्लाच चाकणकर यांनी केला आहे.
त्यावरही चाकणकर थांबल्या आहेत. पुन्हा एक ट्वीट केले. बरे आम्ही कोणाला खरे समजायचे? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी? असा सवाल चाकणकर यांनी केला आहे.
IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?
यावरून एकप्रकारे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे. चाकणकरांचा या ट्वीटला मात्र अद्याप सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलेले नाही.