अजितदादांनी दिला पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा
Ajit Pawar : गेल्या 32 वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे (Pune District Bank) संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी दिली आहे.
मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. काही काळ ते बँकेचे अध्यक्ष देखील होते. बारामती तालुका अ वर्गातून ते निवडणूक लढवत होते. 1991 साली ते पहिल्यांदा जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. बँकेला राज्यात प्रथम आणण्यात अजित पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिला असला तरी आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेऊ, असे बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी सांगितले.
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या; कुत्र्यावर हल्ला करुन केली शिकार…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी करत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर त्यांनी काही आमदार, खासदार यांनासोबत घेत पक्षावर दावा केला आहे. आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगात सांगितले आहे. यानंतर अजित पवार यांनी पक्ष विस्तार आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
‘लेक लाडकी’त मिळणार एक लाख, कधीपासून लागू होणार योजना?
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात 14 जणांचा नावांचा समावेश करण्यात आला आहेत. ईडीने 26 ऑगस्ट 2019 रोजी पीएमएलएल कायद्यानुसार तपास सुरु केला. त्याअंतर्गत 2010 मध्ये एमएससीबीने साखर कारखान्याचा कमी दरात लिलाव केला व अपेक्षित प्रक्रियाही पार पाडली नसल्याचे ईडी तपासात आढळले होते. त्यावेळी अजित पवार एमएससीबीच्या संचालक मंडळावर होते.