भाजपला शिंगावर घेणाऱ्या अमोल बालवडकरांच आधी तिकीट आता निधीही कट?
या घडामोडीला बालवडकर आणि भाजपचा जुना वाद तर कारणीभूत नाही ना? असाही कुजबुज सुरू झाली आहे.
पुणे महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक (Pune) अर्थसंकल्प आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी १५,६६९ कोटी रुपयांच अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा चर्चेत आले.
याचे कारण म्हणजे या अंदाजपत्रकात प्रभागांना दिला गेलेला विकासनिधी ठरला. सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात बालवडकर यांच्या प्रभाग ९ ड चा कुठेही उल्लेख नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत स्थायीचे अध्यक्ष भिमाले आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याच सांगितल. पुन्हा प्रिंटिंग मिस्टेक दुरुस्त करून निधी जाहीर केला जाणार असल्यास स्पष्टीकरण दिल आहे.
दरम्यान, इतक्या नगरसेवकांमधून फक्त बालवडकर यांच्याचं प्रभाक क्रमांक ९ मधील ड विभागाची मिस्टेक कशी? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. ही बाब बालवडकरांच्या लक्षात आल्यांनतर त्यांनी याबाबत सभागृह नेते बीडकरांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याच त्यांना सांगितले. तसेच पाहिल्याच स्थायीच्या बैठकीत निधी मंजूर केला जाईल, अस अश्वासन बालवाडकरांना दिले. याबाबत बोलतांना बालवडकर म्हणाले की, सभागृह नेते बिडकर यांनी दिलेल्या आश्वासनावर यावेळी मी भाजप नेत्यांवर विश्वास ठेवला आहे. पुढे काय होते ते बघूयात, अशी प्रतिक्रिया लेट्सअप’शी बोलतांना त्यांनी दिली.
पुण्यातील प्रभाग क्र. 9 मधील अटीतटीच्या लढतीत अमोल बालवडकरांचा लहू बालवडकरांना धोबीपछाड
दरम्यान, या घडामोडीला बालवडकर आणि भाजपचा जुना वाद तर कारणीभूत नाही ना? असाही कुजबुज सुरू झाली आहे. याच कारण आहे म्हणजे २०२४ ला भाजपमध्ये असतांना बालवडकरांनी कोथरूड विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र वरिष्ठांनी त्यावेळी त्यांची समजूत काढली होती. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बालवडकरांच तिकीट कट करण्यात आल त्यांनतर बालवडकरांनी ऐनवेळी दिवंगत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला होता.
भाजपची पुणे पालिकेत एकहाती सत्ता आली मात्र पूर्ण ताकद लावूनही बालवडकरांनी मिळवलेला विजय भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. नेमक तेच दुःख म्हणून तर प्रिंट मिस्टेक झाली नसेल ना ? की हा योगायोग? यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकूणच बालवडकर आणि भाजपनेत्यांची शाब्दिक चकमक पाहता दाल मे कुछ काला है अशी चर्चा मात्र जोरदार सुरू झाली आहे. यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.