पुण्यात मॉलमध्ये खरेदी करायला गेलेल्या तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार…

  • Written By: Published:
पुण्यात मॉलमध्ये खरेदी करायला गेलेल्या तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार…

Pune Criem : दिवसेंदिवस पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. कधी रिक्षाचालकाकडून विनयभंग, महाविद्यालयात छेडछाड तर घरेलू हिंसा याबरोबरच आता नागरिकांनी गजबजलेल्या मॉलमध्ये देखील महिलांना असुरक्षित वाटू लागेल, असा प्रसंग पुण्यातील विमाननगर परिसरातील मॉलमध्ये एका तरुणी सोबत घडला आहे.

किराणा मालाची खरेदी करण्यासाठी विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमधील स्टार बाजारमध्ये खरेदीस गेलेल्या तरुणीचा अश्लिल व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित 20 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनंतर अमीर अश्फाक अहमद ( वय – 32 रा. मयूर किलबिल सोसायटी, धानोरी ) या इसमावर कलम 354 ‘क’ नुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे.

Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घडलं असं की, पीडित तरुणी ही रविवारी (ता.16 एप्रिल) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत फिनिक्स मॉल येथील स्टार बाजार याठिकाणी किराणा माल खरेदी करण्यासाठी गेली होती.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

यावेळी दोघेही किराणा माल खरेदी करत होते. मात्र, त्यावेळी आरोपी अमीर हा तरुणीच्या मागे जात तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अवयवांकडे लैंगिक समाधान मिळण्याच्या आणि पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा हेतूने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. त्यानंतर तरुणीने थेट विमानतळ पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दिली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube