Arvind Shinde : मुक्ता टिळकांच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या गिधाडांना भाजपने उमेदवारी दिली!

Arvind Shinde : मुक्ता टिळकांच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या गिधाडांना भाजपने उमेदवारी दिली!

पुणे : कसबा पेठ मतदार संघाच्या (Kasba Peth Bypoll) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) या गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजारी होत्या. मात्र, भाजपमधीलच काही गिधाडं त्यांच्या मरणाची वाट होते. भाजपनेही या गिधाडांना उमेदवारी देण्याचा जेव्हा घाट घेतला तेव्हा मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सांगितली. मात्र, तरीही मुक्ता टिळकांच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या गिधाडांनाच भाजपने उमेदवारी दिली, अशा गिधाडांना आपण निवडून देणार आहात का, असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी विचारला. तसेच अशा गिधाडांना धडा शिकवण्याचे आवाहन केले.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी आफ्रिका या देशात भुकबळीतून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. त्याला एका गिधाडाने खाल्ल्याचे छायाचित्र जगभर गाजल्याचे चित्र आपल्याला माहिती आहे, याचा संदर्भ देत काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल केला. अरविंद शिंदे म्हणाले की, भाजप म्हणजे नीतिमत्ता नसलेला पक्ष आहे. दुसऱ्याच्या दुःखातही आपली पोळी भाजून घेणाऱ्या लोकांचा हा पक्ष आहे. त्यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीत चांगलाच धडा शिकवून घरी पाठवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube