जुन्नरचे महिला नेतृत्व हरपले; पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे दुःखद निधन
Asha Buchke Passes Away भाजपा नेत्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचकेंच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
Asha Buchke Passes Away: जुन्नर तालुक्यातील महिला नेतृत्व म्हणून ठसा उमटवलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आणि भाजपा (BJP) नेत्या आशा बुचके (Asha Buchke) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली
आशा बुचके यांनी जिल्हा परिषदेत गटनेत्या म्हणून जबाबदारी सांभाळताना तालुक्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला होता. राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महिला नेतृत्व म्हणून त्यांनी तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विविध सामाजिक उपक्रम आणि स्थानिक प्रश्नांमध्ये त्यांचा सहभाग राहिला.
मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर जुन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. आशा बुचके यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.