माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; मुख्यमंत्र्यांच्या काकांना विश्वास
Balasheb Fadanvis: आम्हाला कधी वाटत नव्हते, तो मुख्यमंत्री होईल. त्याच्या जन्माच्यावेळी पत्रिका माझ्या वडिलांनी बघितले.
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन पुण्यात झाले आहे. या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस (Balasheb Fadanvis) यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत मोठे भाष्य केले आहे. माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बाळासाहेब फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या आठवणी यावेळी सांगितल्या. ते म्हणाले, देवेंद्रने एखादे काम हाती घेतली की तू कुठेही थांबत नसे. एकदा ठरेल की ठरले. त्या अभ्यास हा अलैकीक आहे. तो लॉ कॉलेजला होता. तो आणि त्याचे मित्र दोघे इतके वाद-विवाद करत. नागपूरमध्ये कॉलेजच्या वाद-विवाद स्पर्धा व्हायच्या. दोघेही जिंकायचे. वयाच्या 21 वर्षे हा नगरसेवक झाला. नंतर आमदार झाला आहे. काँग्रेसच्या लोकांचा दबदबा होता. काँग्रेस त्यावेळी मोठ्या प्रमाणात होती, अशा स्थितीत तो लढला आणि मोठ्या दिग्गजांचे त्याने पराभव केले. पहिल्यांदा साडेनऊ हजारांनी, दुसऱ्यांदा 17 हजार, तिसऱ्यांदा 24 हजारांनी जिंकले. तिन्ही निवडणुकीत त्याने दिग्गजांचा पराभव केला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडं यावा; मंगेश चिवटेंसाठी मंत्री-आमदार ताकद लावणार
आम्हाला कधी वाटत नव्हते, तो मुख्यमंत्री होईल. त्याच्या जन्माच्यावेळी पत्रिका माझ्या वडिलांनी बघितले. त्यांनी सांगितले, हा घराण्यांचे नाव रोशन करेल. पण एक गोष्ट आहे, त्याच्यात चंद्रबळ कमी आहे. मग चंद्रबळासह काय करावे लागले ते केले, असेही बाळासाहेब फडणवीस म्हणाले.
तो कायद्या तज्ज्ञ होईल, असे वाटत होते. पण जीवनात कलाटणी कशी मिळतो. तो प्रॅक्टिस करत होता. नागपूरच्या पहिल्या नंबरच्या वकिलांकडे तो काम करत होता. त्यांना वाटत होते, याने आपल्यापुढे जावे. पण वेगळेच घडले. भाजपमध्ये पाठविले. खरोखर इतक्या लहान वयात, इतिहासत कोणी असे केलेले नाही. घरात तो राजकारणाच्या गोष्टी करत नाहीत. तो कुटुंबाच्या गोष्टी करतो. हा माझा पुतण्या आज आणि उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असे वाटते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.