Bhaskar Jadhav : गृहमंत्री पुणे-कोल्हापूरमध्ये आले अन् थापा मारुन गेले

  • Written By: Published:
Bhaskar Jadhav2

पिंपरी : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) पुण्य-कोल्हापूरमध्ये आले आणि थापा मारून गेले. त्यांनी फक्त एक सर्जिकल स्ट्राईक केलं तर धिंडोरा पिटला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र, इंदिरा गांधी असा प्रचार केला नाही. यांना फक्त निवडणूक जिंकायची असते. भाजप क्रूर पक्ष आहे, अशी घणाघाती टीका भाजप आणि अमित शहा यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली.

चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव बोलत होत.

https://www.youtube.com/watch?v=1ZTETdWcueg

भास्कर जाधव म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी रीज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान केला. राज्यपालांनी भाजपच्या गल्लीतील कार्यकर्त्यांप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला त्रास दिला.

Tags

follow us